Monika Shinde
जर तुम्हाला आर्थिक व्यवहार, लेखा तपासणी कर, सल्लागार आणि बिझनेस सल्लागार म्हणून काम करण्याची आवड असेल, तर CA हा करिअरचा योग्य मार्ग आहे. चला, जाणून घेऊया या क्षेत्रात प्रवेश कसा करायचा
CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. हे व्यावसायिक अकाउंटिंग, टॅक्स, फायनान्स आणि कायद्याशी संबंधित क्षेत्रात काम करतात. भारतात या कोर्सचं नियमन इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) करते.
१२वी उत्तीर्ण विद्यार्थी कोणत्याही शाखेतून (कॉमर्स, आर्ट्स किंवा सायन्स) फाउंडेशन कोर्ससाठी अर्ज करू शकतात. ICAI च्या वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर किमान ४ महिन्यांच्या अभ्यासानंतर परीक्षा देता येते.
फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर इंटरमिजिएट कोर्ससाठी अर्ज करता येतो. या कोर्समध्ये दोन ग्रुप असतात आणि प्रत्येक ग्रुपमध्ये चार विषय असतात. विद्यार्थी एकावेळी एक किंवा दोन्ही ग्रुपची परीक्षा देऊ शकतात.
इंटरमिजिएटचा एक ग्रुप पास झाल्यानंतर ICAI मान्यताप्राप्त सीए फर्ममध्ये ३ वर्षांची आर्टिकलशिप करावी लागते. यामध्ये क्लायंट्ससोबत काम, फायनान्शियल स्टेटमेंट्सची तपासणी आणि टॅक्स फाइलिंगसारखा प्रत्यक्ष अनुभव मिळतो.
आर्टिकलशिपच्या शेवटच्या सहा महिन्यांत फायनल कोर्ससाठी नोंदणी करता येते. फायनल परीक्षा दोन ग्रुपांमध्ये विभागलेली असून, त्यात एकूण आठ विषय असतात. दोन्ही ग्रुप उत्तीर्ण झाल्यानंतर CA पदवी मिळते
CA कोर्स कठीण असतो, त्यामुळे नियमित अभ्यास आणि सराव आवश्यक आहे. वेळेचे नियोजन करा, सातत्य ठेवा, यश नक्की मिळेल.