Monika Shinde
फक्त सडपातळ व्यक्तीच फॅशनेबल दिसू शकतात, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.
साडी ही अशी वेशभूषा आहे जी कोणत्याही शरीरयष्टीवर सुंदर दिसते आणि प्रत्येक प्रसंगाला साजेशी ठरते.
मऊ, तलम सिल्क किंवा जॉर्जेट सारखे फॅब्रिक्स निवडल्यास साडी तुमच्या शरीरावर छान बसते आणि तुम्हाला सुंदर 'ग्रेसफुल' लुक मिळतो.
हेवी बॉर्डर आणि भरजरी नक्षीकाम असलेल्या साड्यांमुळे शरीर भारदस्त दिसते. त्याऐवजी, हलक्या डिझाइनची साडी निवडा.
गडद रंगांची सिल्क साडी तुमच्या शरीराला स्लिम लुक देते आणि तुमचे सौंदर्य अधिक खुलवते.
नेटच्या साड्या शरीराला घट्ट चिकटतात, ज्यामुळे फुगलेपण लपते आणि तुम्हाला एकसंध, आकर्षक लुक मिळतो.
रफल्समुळे पोट आणि कंबर व्यवस्थित झाकली जाते, ज्यामुळे तुम्हाला एक आकर्षक आणि स्टायलिश लुक मिळतो.
तुमची शरीरयष्टी कोणतीही असो, आत्मविश्वास आणि योग्य निवडीसह प्रत्येकजण फॅशनेबल दिसू शकतो!