संतोष कानडे
कॅलरी म्हणजे ऊर्जा मोजण्याचं एक एकक आहे. आपण अन्न ग्रहण केल्यानंतर त्यापासून ऊर्जा तयार होत असते.
आपण लांबी मोजण्यासाठी मीटर किंवा किलोमीटर हे एकक वापरतो. तसेच ऊर्जा मोजण्यासाठी कॅलरीचा वापर होतो.
अन्नातील पोषक घटक, जसे कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी यातून ऊर्जेची निर्मिती होते.
हीच ऊर्जा शरीरासाठी गरजेची असते. शारीरिक व्यवहार यातूनच केले जातात. अगदी विचार करणे, श्वास घेणे वगैरे.
शरीरामध्ये अतिरिक्त ऊर्जा झाली तर ती चरबीच्या स्वरुपात साठवली जाते. एक ग्वास पाणी घेतले तरीही ऊर्जा तयार होते
जर ऊर्जेचा वापर झालाच नाही तर फॅट वाढतं, त्यासाठी डॉक्टर नेहमी व्यायामाचा सल्ला देतात.
एक कॅलरी म्हणजे एक ग्रॅम पाण्याचे तापमान १ अंश सेल्सियसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा.
किलोकॅलरी हेदेखील ऊर्जेचे एकक आहे. एक हजार कॅलरीज म्हणजे एक किलो कॅलरी अर्थात kcal.
एक किलोकॅलरी म्हणजे एक किलोग्रॅम पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा
निरोगी जीवनासाठी शरीराचं वजन नियंत्रणात हवं. त्यासाठी शरीरात घेतलेल्या कॅलरीज् आणि बर्न केलेल्या कॅलरीज् यामध्ये संतुलन पाहिजे.