'या' प्राण्याचे अश्रू जगात सर्वात महागडे विकले जातात, कारण काय?

Mansi Khambe

सापाचे विष

किंग कोब्रा, कॉमन क्रेट आणि रसेल व्हायपर हे असे साप आहेत की जर ते माणसाला चावले तर ते क्षणार्धात मरतात. धोकादायक विष असलेल्या या सापांना चालता चालता मृत्यु असेही म्हणतात.

Camel Tears | ESakal

संशोधन

मात्र एका संशोधनातून असे समोर आले आहे की, वाळवंटात आढळणाऱ्या उंटांच्या अश्रूंनी २६ प्रकारच्या सापांचे विष बरे करता येते.

Camel Tears | ESakal

उंटांचे अश्रू

बिकानेर येथील राष्ट्रीय उंट संशोधन केंद्राचा हा अभ्यास वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवू शकतो. उंटांच्या अश्रूंमध्ये आढळणारे अँटीबॉडीज २६ प्रकारच्या सापांच्या विषाला निष्क्रिय करू शकतात.

Camel Tears | ESakal

कारण

हेच कारण आहे की, उंटांचे अश्रू जगातील इतर कोणत्याही प्राण्यांच्या अश्रूंपेक्षा महाग आहेत. हे एका नव्हे तर अनेक संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.

Camel Tears | ESakal

राष्ट्रीय उंट संशोधन केंद्र

केवळ राष्ट्रीय उंट संशोधन केंद्रच नाही, तर अनेक संस्थांनी यावर संशोधन केले आहे आणि असे आढळून आले आहे की उंटाच्या अश्रूंमध्ये अशा अँटीबॉडीज आढळतात.

Camel Tears | ESakal

सर्पदंशावर उपचार

सर्पदंशावर यशस्वीरित्या उपचार करता येतात. लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमधील सर्पदंश संशोधनात असेही आढळून आले आहे की, उंटाच्या अश्रूंपासून सापाच्या विषावर उपचार करण्यासाठी औषध बनवता येते.

Camel Tears | ESakal

सेंट्रल व्हेटर्नरी रिसर्च लॅबोरेटरी

दुबईच्या सेंट्रल व्हेटर्नरी रिसर्च लॅबोरेटरीने केलेल्या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, उंटाच्या अश्रूंमध्ये आश्चर्यकारक क्षमता आहेत.

Camel Tears | ESakal

सॉ-स्केल्ड व्हायपरच्या विषावर उपचार

आता एनआरसीसीच्या शास्त्रज्ञांना उंटाच्या अश्रूंनी सॉ-स्केल्ड व्हायपरच्या विषावर उपचार करण्यात यश आले आहे. संशोधन समोर आल्यानंतर, असे मानले जात आहे की उंटाच्या अश्रूंची किंमत वाढू शकते.

Camel Tears | ESakal

इतर देशांसाठी उपयुक्त

हे संशोधन भारतासह इतर देशांसाठी उपयुक्त ठरू शकते. जिथे दरवर्षी हजारो लोक साप चावल्याने मरतात.

Camel Tears | ESakal

पार्ले-जी मध्ये G कुठून आला? कारण ठरलंय दुसरं महायुद्ध, 'ही' गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

Parle-G | ESakal
येथे क्लिक करा