Yashwant Kshirsagar
विमानात बसायचे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण गरीबी म्हणा किंवा आणखी काही कारणाने अनेकदा हे स्वप्न हे स्वप्नच राहते.
पण जगात असे एक गाव आहे जिथे तुम्हाला प्रत्येक घरी विमान पाहायला मिळते
हे गाव अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आहे.
या गावाचे नाव कॅमरॉन एअर पार्क आहे, इथे लोकांच्या घरासमोर कार पार्किंग नाही तर विमानाची पार्किंग आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही विमाने इतकी महाग आहेत की तुम्ही याचा अंदाजही लावू शकत नाही.
या गावातील बहुतांश लोक विमान चालवतात एवढंच नाही तर ते दुसऱ्या गावी जाण्यासाठी स्वत:च्या विमानानेच जातात
गावातील रस्ते देखील असे बनवले आहेत की, यावर विमाने टेक ऑफ आणि लॅंडिंग करु शकतील