सूरज यादव
अमेरिकेनं शनिवारी व्हेनेझुएलात मोहिम राबवत थेट राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली. मादुरो यांच्यासह पत्नी सीलिया फ्लोरस यांनाही ताब्यात घेण्यात आलंय आहे.
International Law On Arrest Of Foreign Presidents
Esakal
निकोलस मादुरो यांच्यासह पत्नी सीलिया यांना विशेष विमानानं अमेरिकेत आणलं असून त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं आहे. त्यांच्याविरोधात खटला चालवला जाणार आहे.
International Law On Arrest Of Foreign Presidents
Esakal
अमेरिकेच्या या कारवाईवर आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संघटना आणि देशांनी यावर टीकाही केलीय. एखाद्या देशाच्या प्रमुखाला अटक करण्याची परवानगी कशी? याबाबत कायदा काय आहे? असे प्रश्न पुढे आलेत.
International Law On Arrest Of Foreign Presidents
Esakal
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अमेरिकेला कोणत्याही देशाच्या कार्यकारी राष्ट्रपतीला अटक करण्याचा किंवा बंदी बनवण्याचा अधिकार नाही. संयुक्त राष्ट्रानेही अमेरिकेचं हे पाऊल धोकादायक असल्याचं म्हटलंय.
International Law On Arrest Of Foreign Presidents
Esakal
अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती मादुरो यांना अटक करणं हे संयुक्त राष्ट्राच्या कराराचं थेट उल्लंघन आहे. संयुक्त राष्ट्राने याबाबत ऑक्टोबर १९४५ मध्ये करार केला होता.
International Law On Arrest Of Foreign Presidents
Esakal
करारानुसार संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांनी इतर देशांवर कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यापासून टाळलं पाहिजे. यात धमकी देऊ नये असंही म्हटलं आहे.
International Law On Arrest Of Foreign Presidents
Esakal
आर्टिकलमध्ये दोन अपवाद असून त्यानुसार कारवाई करता येते. संयुक्त राष्ट्राने परवानगी दिल्यास आणि आर्टिकल ५१ अंतर्गत शस्त्र हल्ला झाल्यास स्वसंरक्षणासाठी हल्ल्याचा अधिकार आहे.
International Law On Arrest Of Foreign Presidents
Esakal
एखाद्या देशाचा नेता भ्रष्ट असेल तर त्याला अटक करण्याबाबत किंवा राष्ट्रपतींनी गुन्हा केला तर दुसरा देश कारवाई करू शकतो असं कोणत्याही कायद्यात लिहिलेलं नाही.
International Law On Arrest Of Foreign Presidents
Esakal
अमेरिकेकडून मादुरो यांची अटक ही लष्करी मोहिमेचा भाग असल्याचं म्हटलंय. मादुरो यांनी गेल्या २५ वर्षात नार्को दहशतवाद पसरवल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय.
International Law On Arrest Of Foreign Presidents
Esakal
ड्रायव्हर ते राष्ट्रपती! व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो होते सत्य साईबाबांचे भक्त
who is nicolas maduro
Esakal