Nicolas Maduro ड्रायव्हिंग सीट ते राष्ट्रपतींची खुर्ची! सत्य साई बाबांचा निस्सिम भक्त आहे निकोलस मादुरो

सूरज यादव

अमेरिकेचा हल्ला

अमेरिकेने हल्ला करत व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना पत्नीसह ताब्यात घेतलंय. अमेरिकन लष्कराच्या या कारवाईने जगभरात खळबळ उडाली आहे.

nicolas maduro venezuela

|

Esakal

निकोलस मादुरो

काराकसमध्ये एका सामान्य कुटुंबात जन्मलेले निकोलस मादुरो हे सत्य साई बाबांचे भक्त आहेत. त्यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल असं आहे.

nicolas maduro venezuela

|

Esakal

शिक्षण अर्धवट

२३ नोव्हेंबर १९६२ रोजी जन्मलेल्या निकोलस यांनी त्यांचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलेलं नाही. हायस्कूल होताच उदरनिर्वाहासाठी चालक म्हणून काम करायला सुरुवात केली.

nicolas maduro venezuela

|

Esakal

ड्रायव्हिंग ते राजकारण

निकोलस यांनी ट्राझिंट वर्कर्स यूनियनची स्थापना केली आणि त्यातूनच हळू हळू राजकारणात उतरले. क्युबाचा दिवंगत नेता ह्युगो शावेझचा विश्वासू सैनिक म्हणून ओळख निर्माण केली.

nicolas maduro venezuela

|

Esakal

राष्ट्रपती

शावेझ यांच्यासोबत राहून मादुरो यांनी परराष्ट्र मंत्री, उपराष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली. त्यानंतर २०१३ मध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती बनले. तेव्हापासून सर्व सूत्रे त्यांच्याच हातात आहेत.

nicolas maduro venezuela

|

Esakal

सत्य साई बाबांचे भक्त

निकोलस मादुरो हे अध्यात्मिक गुरु सत्य साई बाबा यांचे भक्त आहेत. २००५ मध्ये आंध्र प्रदेशातही ते आले होते. सत्य साई बाबांच्या निधनानंतर व्हेनेझुएलात राष्ट्रीय शोक जाहीर केला होता.

nicolas maduro venezuela

|

Esakal

कार्यालयात फोटो

निकोलस मादुरो यांच्या कार्यालायत सत्य साई बाबांचा फोटो नेहमी असायचा. स्वत: शाकाहारी बनले. त्यांनी साईंच्या संस्थांना व्हेनेजुएलात ते स्वातंत्र्य दिलं जे इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना नव्हतं.

nicolas maduro venezuela

|

Esakal

सत्ताकाळात महागाई

व्हेनेझुएलात सत्ता मिळवली तरी त्यांच्या कार्यकाळात जनतेला अनेक संकटांचा सामना करावा लागला. महागाई, औषधांचा तुटवडा यामळे भीषण समस्या निर्माण जाल्या होत्या.

nicolas maduro venezuela

|

Esakal

एका निर्णयानं अख्खा समुद्र ५० वर्षात आटला, उरलं केवळ नाव आणि वाळूत जहाजांचे अवशेष

Aral Sea

|

Esakal

इथं क्लिक करा