एका किडनीवर माणूस किती काळ जगू शकतो?

Aarti Badade

शरीराचे नैसर्गिक फिल्टर: किडनी

किडनी आपल्या रक्तातील युरिया, क्रिएटिनिन आणि ॲसिडसारखे विषारी पदार्थ गाळून लघवीवाटे बाहेर काढण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करते.

Living with one kidney

|

Sakal

एका किडनीवर जगणे शक्य आहे का?

हो, आरोग्य तज्ज्ञांच्या मते एखादी व्यक्ती केवळ एका किडनीवरही दीर्घकाळ आणि निरोगी आयुष्य सहज जगू शकते.

Living with one kidney

|

Sakal

जन्मतः एकच किडनी असणे

काही लोकांमध्ये जन्मापासूनच एक किडनी काम करत असते, तरीही त्यांना कोणतीही अडचण येत नाही आणि ते सामान्य जीवन जगतात.

Living with one kidney

|

Sakal

किडनी प्रत्यारोपण कधी?

जेव्हा दोन्ही किडनी निकामी होतात आणि रक्तात विषारी घटक वाढून जीव धोक्यात येतो, तेव्हा डॉक्टर किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला देतात.

Living with one kidney

|

Sakal

शस्त्रक्रियेनंतरची रिकव्हरी

किडनी दान केल्यानंतर किंवा प्रत्यारोपणानंतर शरीर पूर्णपणे बरे होण्यासाठी साधारण सहा आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो.

Living with one kidney

|

Sakal

वर्षातून एकदा 'ही' तपासणी आवश्यक

एका किडनीवर असणाऱ्या व्यक्तींनी वर्षातून एकदा ब्लड प्रेशर, लघवीची तपासणी आणि ब्लड युरिया टेस्ट करणे गरजेचे असते.

Living with one kidney

|

Sakal

६ आठवडे 'या' गोष्टी टाळा

शस्त्रक्रियेनंतर किमान दीड महिना जड वस्तू उचलणे, कठीण व्यायाम किंवा कोणताही मैदानी खेळ खेळणे टाळावे.

Living with one kidney

|

Sakal

आहार आणि जीवनशैली

निरोगी राहण्यासाठी अल्कोहोल, कॅफिन आणि अतिप्रमाणात प्रोटिनयुक्त पदार्थ टाळावेत. तसेच भरपूर पाणी पिणे आणि सकस आहार घेणे फायदेशीर ठरते.

Living with one kidney

|

Sakal

'थ्रोट कॅन्सर'ची सुरवातीची 'ही' लक्षणं दुर्लक्ष करू नका!

Throat cancer symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा