संतोष कानडे
विमान उड्डाण घेत असताना किंवा उतरत असताना पक्ष्यांची धडक बसण्याचा धोका अधिक असतो.
चिमणी विमानाच्या जेट इंजिनमध्ये गेल्यास इंजिनच्या कार्यात बिघाड होऊ शकतो.
इंजिनमधील पंखे किंवा इतर महत्त्वाच्या भागांचे नुकसान झाल्यास विमानाची शक्ती कमी होऊ शकते.
एका इंजिनमध्ये बिघाड झाला तरी वैमानिक दुसऱ्या इंजिनच्या मदतीने विमान नियंत्रित करू शकतात.
मात्र दोन्ही इंजिनांवर पक्ष्यांच्या धडकेचा परिणाम झाल्यास परिस्थिती अत्यंत गंभीर बनू शकते.
विशेषतः विमान जमिनीपासून कमी उंचीवर असताना असा बिघाड झाल्यास वैमानिकांना कमी वेळेत निर्णय घ्यावा लागतो.
चिमणीसारख्या लहान पक्ष्याच्या धडकेनेही विमान क्रॅश होऊ शकते, मात्र अशी घटना अत्यंत दुर्मिळ असते.
पक्षी इंजिनमध्ये जाण्याच्या या घटनेला विमान वाहतूक क्षेत्रात 'बर्ड स्ट्राइक' म्हणतात.
पक्ष्यांच्या धडकेमुळे इंजिन बंद पडून विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागू शकते.
चिमणीच्या धडकेने विमान क्रॅश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पण प्रत्यक्षात असा धोका पक्ष्याचा आकार, धडकेचे ठिकाण आणि परिस्थितीवर अवलंबून असतो.