शांत झोप येत नाही? मग झोपेस मदत करणारे 5 पदार्थ

Aarti Badade

शांत झोपेसाठी उपयुक्त पदार्थ

निरोगी झोप ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. जाणून घ्या अशा ५ पदार्थांबद्दल जे झोपेस मदत करतात.

Sleep-Friendly Foods | Sakal

चॅमोमाईल टी – नैसर्गिक शांतीचा पेय

या टीमध्ये असलेला अॅपिजेनीन नावाचा घटक तणाव आणि चिंता कमी करून शांत झोप आणतो.

Sleep-Friendly Foods | Sakal

झोपेचा दर्जा सुधारतो

एका अभ्यासानुसार २८ दिवस चॅमोमाईल टी घेतल्याने मध्यमवयीन लोकांची झोप सुधारली.

Sleep-Friendly Foods | Sakal

काळजी घ्या – कॅफिन नसलेली टी निवडा

काही हर्बल टीमध्ये कॅफिन असते, जे झोप बिघडवू शकते. लेबल नीट वाचून घ्या.

Sleep-Friendly Foods | Sakal

आंबवलेले पदार्थ – गट हेल्थ आणि झोप दोन्ही सुधारतात

प्रोबायोटिक गुणधर्मामुळे पचन सुधारते आणि मेंदू-आतड्याचा संबंध मजबूत होतो, ज्याचा परिणाम झोपेवर होतो.

Sleep-Friendly Foods | Sakal

संशोधन काय सांगतं?

कोरियातील आणि इतर अभ्यासांतून दिसून आलं की प्रोबायोटिक वापरल्याने प्रौढांमध्ये झोपेच्या तक्रारी कमी होतात.

Sleep-Friendly Foods | Sakal

केळं – नैसर्गिक स्नायू रिलॅक्सर

केळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात, जे स्नायूंना आणि मज्जासंस्थेला शांत करतात.

Sleep-Friendly Foods | Sakal

डार्क चॉकोलेट – झोपेसाठी गोड पर्याय

यातील नैसर्गिक संयुगे मेंदूला शांत करतात आणि झोपेस प्रवृत्त करतात. मात्र प्रमाणात खा!

Sleep-Friendly Foods | Sakal

भोपळ्याच्या बिया – झोपेचा दर्जा वाढवणाऱ्या सुपरसीड्स

मॅग्नेशियम, फायबर, प्रोटीन, आणि लोह भरपूर असलेल्या या बिया शांत झोपेसाठी उपयुक्त आहेत.

Sleep-Friendly Foods | Sakal

झोपेसाठी आहार सुधारा, आरोग्य सुधरेल!

हे नैसर्गिक पदार्थ तुमची झोप सुधारू शकतात. आजपासून आहारात हे पदार्थ घ्या आणि झोपेचा दर्जा वाढवा.

Sleep-Friendly Foods | Sakal

अचानक छातीत कळ? 'हा' असू शकतो का हृदयविकाराचा पहिला इशारा?

Heart Attack Signs | Sakal
येथे क्लिक करा