Aarti Badade
हल्ली चाळिशीच्या वयातच लोकांना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण? उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष!
रक्तवाहिन्यांवर रक्ताचा दाब वाढणे म्हणजेच हाय ब्लड प्रेशर. यामुळे हृदयावर आणि इतर अवयवांवर ताण येतो.
सामान्य: 120/80 mmHg,पूर्व उच्चदाब: 121–130 / 80–89 mmHg,उच्च रक्तदाब: 140/90 mmHg पेक्षा जास्त असावा.
वाढते वय ,ताण,लठ्ठपणा ,धूम्रपान,जास्त मीठ व मद्यपान,अनुवंशिकता व अनियमित आहार ही कारणे आहेत.
अशक्तपणा,दम लागणे,अचानक चक्कर,अंधुक दिसणे,जिना चढताना थकवा ही लक्षणे आहेत.
हृदयविकाराचा झटका,मेंदूवर परिणाम (स्ट्रोक),मूत्रपिंड निकामी,धमन्यांमध्ये अडथळा,अनेक अवयव निकामी होणे असे गंभीर परिणाम होऊ शकतात.
साय काढलेलं दूध,हिरव्या भाज्या,सूर्यफूल बिया,केळी, बटाटा, डाळी,डार्क चॉकलेट (मर्यादित) हे खावे.
दररोज व्यायाम,तणावमुक्त राहणं,योगा, ध्यान,सात्त्विक आहार,वेळेवर झोप हे बदल करा.
नियमित रक्तदाब तपासणी, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे,जीवनशैली सुधारणा,अन्ननियंत्रण व सवयींवर लक्ष हे करणे गरजेचे आहे.
उच्च रक्तदाबावर वेळेवर उपाय केल्यास हृदयविकार व इतर धोक्यांपासून स्वतःचं संरक्षण करता येतं.