Aarti Badade
भारतीय स्वयंपाकघरात नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण जेव्हा घरात कोणाला मधुमेह होतो, तेव्हा 'ओलं खोबरं खावं की नको?' हा मोठा प्रश्न निर्माण होतो.
Diabetics Eat Fresh Coconut
Sakal
मधुमेही व्यक्ती मर्यादित प्रमाणात कच्चं ओलं खोबरं नक्कीच खाऊ शकतात. नारळाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' (GI) कमी असल्याने तो साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
Diabetics Eat Fresh Coconut
Sakal
नारळामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. हे फायबर पचनक्रिया संथ करते, ज्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी एकाएकी वाढत नाही.
Diabetics Eat Fresh Coconut
Sakal
नारळामध्ये 'मिडीयम-चेन फॅट्स' असतात. हे फॅट्स शरीरात चरबी म्हणून साचण्याऐवजी लगेच ऊर्जेत रूपांतरित होतात, ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो.
Diabetics Eat Fresh Coconut
Sakal
नारळातील तंतुमय पदार्थ पोट जास्त काळ भरलेले ठेवतात. यामुळे वारंवार भूक लागत नाही, जे टाईप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
Diabetics Eat Fresh Coconut
Sakal
नारळात कॅलरी आणि फॅट्स जास्त असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या मते, मधुमेही रुग्ण दिवसाला साधारण ३० ते ४० ग्रॅम (सुमारे २-३ चमचे) ओलं खोबरं सुरक्षितपणे खाऊ शकतात.
Diabetics Eat Fresh Coconut
sakal
खोबरं किसून ते भाज्यांवर किंवा सॅलडमध्ये घालून खाणे सर्वात उत्तम आहे. ओल्या नारळाची चटणी देखील इतर लो-जीआय पदार्थांसोबत खाता येते.
Diabetics Eat Fresh Coconut
Sakal
नारळ नैसर्गिकरित्या चांगला असला तरी नारळाच्या वड्या, बर्फी किंवा साखर घातलेले पदार्थ मधुमेहींनी पूर्णपणे टाळावेत.
Diabetics Eat Fresh Coconut
Sakal
प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे आहारात नारळाचा समावेश केल्यानंतर एकदा शुगर लेव्हल तपासून पहा आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Diabetics Eat Fresh Coconut
Sakal
Eye Yoga Exercises
sakal