Aarti Badade
मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे. त्यामुळे आहारात काय घ्यावं, हे काळजीपूर्वक ठरवावं लागतं.
साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी फळांचं प्रमाण आणि प्रकार यांची निवड अत्यंत महत्त्वाची असते.
खरबूजात साखरेचं प्रमाण असलं तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) सुमारे 65 असतो — म्हणजे मध्यम पातळीचा.
GI जास्त नसल्यामुळे खरबूज खाल्ल्यानं साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही.
होय, पण मर्यादित प्रमाणातच खावं. अति सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
जेवणात थोडक्याच प्रमाणात, सकाळी किंवा दुपारी खरबूज घेणं फायदेशीर ठरू शकतं.
आईस्क्रीम, रस किंवा पॅक्ड स्वरूपातील खरबूज टाळा. नैसर्गिक व ताजं खरबूजच निवडा.
मधुमेहाच्या रुग्णांनीही खरबूज खाऊ शकतात, पण ते प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्लं तरच फायदेशीर ठरतं.