Aarti Badade
कर्डू ही पावसाळ्यात शेतात व रानमाळावर सहज उगवणारी रानभाजी आहे. तिला कोंबडा, कड्डू, हरळू आणि मोरपंख अशा अनेक नावांनी ओळखलं जातं.
कर्डूचं शास्त्रीय नाव आहे Celosia argentina. पाने लांबट, टोकदार, आणि त्यावर कत्थ्या रंगाचे बारीक ठिपके असतात.
ग्रामीण भागात कर्डू सहज मिळतो. महिला निंदतानाच कोवळी पाने आणि फांद्या तोडून भाजी करतात.
कर्डू चविला माठासारखा लागतो. मूगडाळ किंवा चनाडाळ घालून सुकी भाजी केली जाते – पौष्टिक आणि चविष्ट!
कर्डू पचनास मदत करतो आणि त्वचेच्या अनेक समस्यांवर प्रभावी आहे. तो नैसर्गिक आणि घरगुती उपाय म्हणून उपयुक्त आहे.
या वनस्पतीला लाल व पांढरे तुरे येतात, जे कोंबड्यासारखे दिसतात. त्यामुळे त्याला ‘कोंबडा’ असेही म्हणतात.
बियांवर आलेला कर्डू जेव्हा वाऱ्यावर डोलतो, तेव्हा संपूर्ण शेत लालपांढरं होऊन एक निसर्गचित्रच निर्माण होतं.
त्वचेसाठी फायदेशीर, पचनासाठी उपयुक्त आणि निसर्गाने दिलेली अनमोल रानभाजी म्हणजे कर्डू.