महिलांमध्ये हा आजार का वाढतोय अन् बरा होण्याची शक्यता किती? डॉक्टरांचा स्पष्ट सल्ला

Aarti Badade

आजाराची वाढ

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांना थायरॉईड, पीसीओडी (PCOD) आणि पीसीओएस (PCOS) सारख्या हार्मोनल समस्यांचा सामना करावा लागत आहे.

PCOD Women's Health

|

Sakal

पीसीओडी म्हणजे काय?

पीसीओडी (Polycystic Ovarian Disease) हा एक सामान्य हार्मोनल डिसऑर्डर आहे. यात अंडाशयात (Ovaries) खूप जास्त अपरिपक्व अंडी तयार होऊन लहान गाठी (Cysts) तयार होतात.

PCOD Women's Health

|

Sakal

प्रमुख लक्षणे

या स्थितीमुळे अनियमित मासिक पाळी (Irregular Periods), वजन वाढणे (Weight Gain), पुरळ (Acne), जास्त केसांची वाढ आणि वंध्यत्व (Infertility) यासारख्या समस्या येतात.

PCOD Women's Health

|

Sakal

पीसीओडी बरा होऊ शकतो?

डॉक्टरांच्या मते, पीसीओडीची समस्या पूर्णपणे दुरुस्त (Cure) करता येत नाही, पण ती व्यवस्थापित (Managed) करता येते आणि लक्षणे दूर करता येतात.

PCOD Women's Health

|

Sakal

आहार आणि जीवनशैली

हार्मोनल संतुलन (Hormonal Balance) राखण्यासाठी संपूर्ण धान्य, प्रथिने आणि फायबरयुक्त (Fiber) आहार घ्या. दररोज व्यायाम, वेट ट्रेनिंग किंवा योग करा.

PCOD Women's Health

|

Sakal

वजन नियंत्रण

वजन कमी (Weight Loss) केल्यास पीसीओडीची लक्षणे मोठ्या प्रमाणात सुधारतात आणि मासिक पाळी नियमित (Regular Periods) होण्यास मदत होते. याने इन्सुलिन प्रतिरोध कमी होतो.

PCOD Women's Health

|

Sakal

वैद्यकीय उपचार

हार्मोनल थेरपी मासिक पाळी आणि केसांची वाढ नियंत्रित करते. मेटफॉर्मिन (Metformin) सारखी औषधे इन्सुलिन प्रतिरोध नियंत्रित करण्यासाठी वापरली जातात.

PCOD Women's Health

|

Sakal

प्रजनन उपचार

ज्या महिलांना गर्भधारणा (Pregnancy) होण्यास अडचण येत असेल, त्यांना ओव्हुलेशन-प्रेरित करणारी औषधे किंवा आयव्हीएफ (IVF) सारख्या प्रजनन उपचारांचा फायदा होऊ शकतो.

PCOD Women's Health

|

Sakal

थंड–जळजळलेल्या पायांना आराम! नसांतील ताण आणि विटामिन कमतरतेवर 7 जलद उपाय!

Burning Feet Remedies

|

sakal

येथे क्लिक करा