'कपल'ला पोलिसांनी अडवलं तर घरच्यांचा नंबर द्यावा लागतो का?

Vinod Dengale

पोलिस

तुम्ही गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसोबत बाहेर फिरत असाल आणि पोलिसांनी घरच्यांचा नंबर मागितला तर काय कराल?

18 वर्षांपेक्षा कमी

जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल, तर संबंधित प्रकरणानुसार पोलिसांना पालकांशी संपर्क साधण्याचा अधिकार आहे तुम्हाला तो द्यावा लागेल.

18 वर्षे पूर्ण

तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही कायदेशीरदृष्ट्या प्रौढ आहेत. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक निर्णयांमध्ये तुमची संमती महत्त्वाची ठरते.

नकार

तुम्ही प्रौढ असाल्यास घरच्यांच्या नंबरसाठी तुमच्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाही.

पोलिस चौकशी

मात्र कुठल्याही कायदेशीर चौकशीमध्ये पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.

धमकी किंवा पैशांची मागणी

जर एखादा अधिकारी गैरवर्तन, धमकी किंवा बेकायदेशीर पैशांची मागणी करत असल्याचे वाटत असेल, तर अधिकृत तक्रार यंत्रणेकडे दाद मागा.

तक्रार कुठे

परिस्थितीनुसार 112 या आपत्कालीन क्रमांकावर मदत मागता येते. तसेच संबंधित पोलिस अधिक्षक किंवा पोलीस आयुक्तांकडे तक्रार करता येऊ शकते.

MRP पेक्षा जास्त पैसे घेतले? दुकानदाराविरोधात अशी करा तक्रार!

Shopkeeper Charged You More Than MRP?

|

eSakal

हेही वाचा