Saisimran Ghashi
मासिक पाळी दरम्यान सौम्य ते मध्यम प्रमाणात होणारी पोटदुखी ही सामान्य मानली जाते आणि गर्भधारणेवर याचा तितकासा परिणाम होत नाही.
जर दर महिन्याला खूप तीव्र दुखणे होत असेल, आणि ते अॅनलजेसिक गोळ्यांनीही कमी होत नसेल, तर हे एंडोमेट्रिओसिस किंवा फायब्रॉइड्स सारख्या अडचणींचं लक्षण असू शकतं.
ही एक वैद्यकीय स्थिती आहे जिच्यामुळे पाळीत तीव्र वेदना होतात आणि भविष्यात गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते.
जर मासिक पाळी अनियमित आणि पोटदुखी यांसोबत असेल, तर PCOS (Polycystic Ovary Syndrome) चे निदान होऊ शकते. यामुळे देखील गर्भधारणेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
काही वेळा गर्भाशय किंवा पेल्व्हिक एरिया संबंधित इन्फेक्शन (PID) मुळेही पोटात वेदना होतात. वेळेवर उपचार न झाल्यास याचा परिणाम फर्टिलिटीवर होऊ शकतो.
अधिक तणाव, झोपेचा अभाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे पाळीत पोटदुखी वाढू शकते आणि हे हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकते, जे गर्भधारणेवर प्रभाव टाकू शकते.
जर पोटदुखी दर महिन्याला तीव्र होत असेल, तर गायनॅकोलॉजिस्टचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. कारण वेळेवर निदान आणि उपचार केल्यास गर्भधारणेतील अडथळे टाळता येतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.