गारुड्याने दात तोडल्यावरही साप चावू शकतो का? त्यामुळे माणूस मरू शकतो का?

Payal Naik

धडकी भरते

साप दिसला की अनेकांना धडकी भरते. अनेकजण सापापासून दूर राहणंच पसंत करतात. तो कधी चावेल याचा नेम नाही.

SNAKE

|

ESAKAL

सापाची छेड

मात्र काही जण मुद्दाम सापाची छेड काढताना दिसतात. काही ठिकाणी तर सापांना पकडून त्यांचे दात तोडले जातात.

SNAKE

|

ESAKAL

पूजेसाठी

असे साप ठिकठिकाणी पूजेसाठी आणले जातात. मात्र एकदा दात काढले की तो साप तुम्हाला चावू शकत नाही का?

SNAKE

|

ESAKAL

क्रूर प्रक्रिया

सापाचे दात तोडणे ही अत्यंत क्रूर प्रक्रिया आहे. त्यामुळे सापाला खूप मोठी इजा होऊ शकते. मात्र त्यानंतर साप चावू शकत नाही असं म्हणणं योग्य नाही.

SNAKE

|

ESAKAL

माणसांसारखे

सापाचे विषाचे दात काढले तरी सापांचे दात माणसांसारखे कायमचे एकदाच येऊन थांबत नाहीत.

SNAKE

|

ESAKAL

फॅंग्स

अनेक सापांमध्ये नवीन दात तयार होण्याची क्षमता असते. विषारी सापांचे फॅंग्सही बदलत राहू शकतात; जुना फॅंग गेला किंवा तुटला तर नवीन फॅंग विकसित होऊ शकतो.

SNAKE

|

ESAKAL

विष

म्हणजेच सापाचा तुटलेला दात काही महिन्यांनी परत येतो. शिवाय दात तुटलेला असला तरी त्याचं विष मुळीच कमी झालेलं नसतं.

SNAKE

|

ESAKAL

मरू शकतो

त्यामुळे तुटलेल्या दाताचा किंवा नव्याने आलेल्या लहान दाताचा स्पर्श झाला तरीही त्या विषाने माणूस मरू शकतो.

SNAKE

|

ESAKAL

समज चुकीचा

त्यामुळे दात तोडलेला साप सुरक्षित आहे किंवा तो चावणार नाही, असा समज चुकीचा आहे.

SNAKE

|

ESAKAL

क्षमता

नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे, वायपर कुटुंबातील इतर साप या सापांमध्ये पुन्हा दात येण्याची क्षमता असते.

SNAKE

|

ESAKAL

'सनई चौघडे' मधील शरू कुठे राहते माहितीये? मुंबईत या ठिकाणी आहे घर

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

esakal

येथे क्लिक करा