पुजा बोनकिले
भावना व्यक्त न केल्याने मनात तणाव वाढू शकतो. जे कालांतराने डिप्रेशनला कारणीभूत ठरते.
भावना दडपल्यामुळे व्यक्ती स्वतःच्या भावनांना महत्त्व देत नाही आणि स्वतःकडे दुर्लक्ष करते.
भावना व्यक्त न केल्यामुळे संवाद कमी होतो. यामुळे नात्यांमध्ये गैरसमज वाढतात.
सतत भावना दाबल्यास व्यक्तीला वाटू लागते की कोणालाही आपल्याला समजून घ्यायचं नाही.
भावना सारख्या व्यक्त न केल्याने सतत नकारात्मक विचार फिरू लागतात. जे डिप्रेशन वाढवतात.
डोकेदुखी, थकवा, पचन समस्या, झोपेचा अभाव हे लक्षणं वाढतात.
भावना व्यक्त न करणारी व्यक्ती स्वतःला दुय्यम समजू लागते, आत्मविश्वास गमावते.
भावना सतत आत ठेवण्याने मन थकतं, मानसिक क्षमतेवर परिणाम होतो.
व्यक्ती खऱ्या भावना लपवून सतत आनंदी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करते, जे अधिक थकवणारे असते.