आठवड्यातून एकदा 'ही' चूक केली तरी कॅन्सरचा धोका वाढू शकतो?

Aarti Badade

सवयी

फक्त वीकेंडला सिगारेट, गुटखा किंवा दारू घेत असाल तरी सावध राहा; या सवयी तोंड आणि घशाच्या कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.

|

Sakal

दुर्लक्ष नको!

वीकेंडला किंवा पार्टीमध्येच सिगारेट, गुटखा अथवा तंबाखू घेण्याची सवयही पुढे वाढू शकते आणि आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकते.

cancer

|

Sakal

तंबाखू तोंडाच्या कॅन्सरचं मोठं कारण

गुटखा, खैनी, जर्दा आणि तंबाखूयुक्त पानामुळे तोंडाची आतील त्वचा व हिरड्यांना नुकसान होऊ शकते, तर सिगारेट-बिडीमुळे तोंड, डोके आणि मानेच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

cancer

|

Sakal

दारू आणि तंबाखूचं कॉम्बिनेशन

दारू आणि तंबाखू एकत्र घेतल्यास तोंडाच्या आतील भागावर परिणाम होऊन कॅन्सरला कारणीभूत ठरू शकणाऱ्या रसायनांचा संपर्क वाढू शकतो.

cancer

|

Sakal

तोंडात पांढरे किंवा लाल डाग

तोंडात पांढरा किंवा लालसर डाग, गाठ किंवा जाडसरपणा, चावताना त्रास आणि सतत जळजळ जाणवत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

cancer

|

Sakal

गिळताना त्रास किंवा आवाजात बदल?

अन्न-पाणी गिळताना त्रास, मानेत वेदनारहित गाठ किंवा आवाजात बराच काळ बदल जाणवत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

cancer

|

Sakal

आरोग्याची

दारू, सिगारेट किंवा गुटख्याऐवजी व्यायाम, सायकलिंग, पोहणे किंवा आवडत्या अॅक्टिव्हिटीचा पर्याय निवडा आणि संशयास्पद लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

cancer

|

Sakal

स्किन ग्लोसाठी रोज फॉलो करा 'ही' एक सवय!

Skin sleep benefits 

|

Sakal

येथे क्लिक करा