स्किन ग्लोसाठी रोज फॉलो करा 'ही' एक सवय!

Aarti Badade

ग्लोइंग स्किनसाठी झोप

महागडी स्किनकेअर प्रोडक्ट्स वापरण्याबरोबरच पुरेशी आणि नियमित झोप घेणंही त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं. रात्री शरीर विश्रांती घेत असताना त्वचेची नैसर्गिक रिपेअर प्रक्रिया सुरू होते.

Skin sleep benefits 

|

Sakal

गाढ झोपेमुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत

रात्रीची शांत आणि गाढ झोप शरीराला आवश्यक विश्रांती देते. रक्ताभिसरण सुरळीत राहण्यास मदत झाल्याने त्वचेचा ताजेपणा आणि चेहऱ्याचा फ्रेश लूक टिकून राहण्यास मदत होऊ शकते.

Skin sleep benefits 

|

Sakal

झोपेत होते त्वचेची रिपेअर प्रक्रिया!

रात्री त्वचेतील पेशींची दुरुस्ती आणि नूतनीकरणाची प्रक्रिया सक्रिय होते. त्यामुळे पुरेशी झोप घेतल्यानंतर सकाळी चेहरा अधिक फ्रेश आणि रिलॅक्स दिसू शकतो.

Skin sleep benefits 

|

Sakal

डोळ्यांखालील काळेपणाही होऊ शकतो कमी

झोप पूर्ण न झाल्यास डोळ्यांखाली सूज किंवा काळसरपणा अधिक जाणवू शकतो. त्यामुळे नियमित आणि पुरेशी झोप घेतल्याने चेहऱ्याचा थकलेला लूक कमी होण्यास मदत होऊ शकते.

Skin sleep benefits 

|

Sakal

झोप आणि हार्मोन्सचा आहे संबंध

पुरेशी झोप शरीरातील तणावाशी संबंधित हार्मोन्सच्या संतुलनासाठी महत्त्वाची ठरते. झोपेची गुणवत्ता चांगली असेल तर त्याचा त्वचेच्या एकूण आरोग्यावरही चांगला परिणाम होऊ शकतो.

Skin sleep benefits 

|

Sakal

मग किती तास झोप घ्यावी?

त्वचेच्या आरोग्यासह संपूर्ण शरीराला पुरेशी विश्रांती मिळण्यासाठी नियमित झोप महत्त्वाची आहे. फक्त चेहऱ्यावरील ग्लोसाठी नव्हे, तर शरीराच्या आरोग्यासाठीही झोपेला प्राधान्य द्या.

Skin sleep benefits 

|

Sakal

नैसर्गिक ग्लोसाठी झोपेकडे दुर्लक्ष नको!

पुरेशी झोप घेतल्याने चेहरा अधिक फ्रेश, रिलॅक्स आणि नैसर्गिक ग्लो असलेला दिसू शकतो. संतुलित आहार आणि योग्य स्किनकेअरही महत्त्वाचे आहेत.

Skin sleep benefits 

|

Sakal

निरोगी शरीरासाठी रोज करा 'या' ५ सोप्या योगिक क्रिया

immunity yoga

|

Sakal

येथे क्लिक करा