Pranali Kodre
चंद्र हा नेहमीच सर्वांसाठी कुतुहलाचा विषय राहिलेला आहे. चंद्रावर संशोधनही सुरू आहेत.
Can Plants Grow on the Moon
Sakal
अशात चंद्रावर झाडं उगवणे शक्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
Can Plants Grow on the Moon
Sakal
तर तत्त्वतः आणि प्रयोगशाळेच्या पातळीवर चंद्रावर झाडं उगवणे शक्य आहे, परंतु नैसर्गिक वातावरणात सध्या तरी अशक्य आहे.
Can Plants Grow on the Moon
Sakal
नासाच्या अपोलो मोहिमेदरम्यान फ्लोरिडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावरून आणलेल्या मातीत ('रेगोलिथ') 'अराबिडॉप्सिस' नावाची वनस्पती यशस्वीपणे उगवून दाखवली.
Can Plants Grow on the Moon
Sakal
चंद्राच्या मातीत सेंद्रिय पदार्थ (Organic Matter) आणि आवश्यक पोषक घटक नाहीत, त्यामुळे झाडांचा विकास हळू होतो.
Can Plants Grow on the Moon
Sakal
चंद्रावर कार्बन डायऑक्साइड किंवा ऑक्सिजनसारखे वायू नसल्यामुळे थेट प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) होणे अशक्य आहे.
Can Plants Grow on the Moon
Sakal
चंद्राच्या पृष्ठभागावर द्रवरूप पाणी उपलब्ध नाही; तसेच चंद्रावर ओझोन थर किंवा चुंबकीय संरक्षण कवच नसल्यामुळे सूर्याची घातक अतिनील (UV) आणि कॉस्मिन किरणे वनस्पती पेशी नष्ट करू शकतात.
Can Plants Grow on the Moon
Sakal
चंद्रावर दिवसा तापमान सुमारे १२०°C पर्यंत,तर रात्री -१३०°C च्या खाली घसरते, जे झाडांसाठी घातक ठरू शकते.
Can Plants Grow on the Moon
Sakal
भविष्यात चंद्रावर झाडे उगवायची असतील तर मानवनिर्मित 'ग्रीनहाऊस' (हरितगृह) बनवावे लागतील, जिथे तापमान, हवा आणि दाबाचे नियंत्रण केले जाऊ शकते.
Can Plants Grow on the Moon
Sakal
मातीऐवजी पाण्यात आवश्यक पोषक घटक मिसळून झाडे उगवण्याचे 'हायड्रोपोनिक्स' हे तंत्रज्ञान चंद्रावर उपयोगी ठरू शकते.
Can Plants Grow on the Moon
Sakal
Nag Champa vs Son Champa
Sakal