सकाळ डिजिटल टीम
रक्षाबंधन हा जरी बहिन-भावाच्या नात्याचा सण असला तरी अनेक ठिकाणी पत्नी ही तिच्या नवऱ्याला राखी बांधते अशी प्रथा अहे. पण पत्नी ने नवऱ्याला राखी बांधने योग्य आहे का? जाणून घ्या.
पारंपरिक हिंदू संस्कृतीनुसार, राखी फक्त भाऊ-बहिणीच्या नात्यातच बांधली जाते. या प्रथेमागे एक निश्चित सामाजिक आणि कौटुंबिक रचना आहे, जिथे भाऊ बहिणीचा रक्षक मानला जातो.
राखीचा मुख्य अर्थ 'रक्षणाचे बंधन' आहे. काही जोडप्यांच्या मते, पती-पत्नीचे नाते हे संरक्षणावर आणि विश्वासावर आधारित असते, त्यामुळे पत्नी पतीला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू शकते.
लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांचे सर्वात चांगले मित्र आणि भावनिक आधार बनतात. राखी बांधणे हे त्यांच्या मैत्रीचे आणि परस्पर आधाराचे प्रतीक असू शकते.
सध्याच्या काळात पती-पत्नी दोघेही एकमेकांची काळजी घेतात. त्यामुळे फक्त भावानेच बहिणीचे रक्षण करावे, असा विचार मागे पडत आहे. पत्नीही पतीचे रक्षण करते, हे दाखवण्यासाठी ती राखी बांधू शकते.
काही जोडपी आपल्या नात्याची खोली दाखवण्यासाठी नवीन परंपरा निर्माण करत आहेत. पत्नीने पतीला राखी बांधणे ही त्यापैकीच एक नवी परंपरा मानली जाते.
राखीचा धागा फक्त रक्ताच्या नात्यालाच नाही, तर प्रेमाच्या आणि विश्वासाच्या कोणत्याही पवित्र नात्याला जोडणारे प्रतीक बनू शकतो.
आधुनिक विचारसरणीनुसार, नातेसंबंधांना कोणत्याही चौकटीत बांधून ठेवण्याची गरज नसते. पती-पत्नीचे नाते हे प्रेम, आदर आणि संरक्षणावर आधारित असल्याने राखी हे त्याचे प्रतीक बनू शकते.
पत्नीने पतीला राखी बांधल्यास, हे नाते अधिक दृढ होते आणि त्यांचा एकमेकांवरील विश्वास वाढतो, असा सकारात्मक संदेशही समाजात जातो.