लग्नानंतर महिलांचे नाव बदलण्याबाबत कायदा काय सांगतो?

सकाळ डिजिटल टीम

लग्न

लग्नानंतर महिला पतीचं किंवा सासरचं आडनाव परंपरेनुसार लावतात. पण कायद्याने असं कोणतंही बंधन नाहीय.

women name change

|

Esakal

पतीचं आडनाव

कायद्यानुसार कोणत्याही महिलेला पतीचं आडनाव लावण्याची सक्ती नाही.

women name change

|

Esakal

अधिकार

भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला स्वत:ची ओळख जपण्याचा पूर्ण अधिकार आहे.

women name change

|

Esakal

कायदा

हिंदू विवाह अधिनियम, हिंदू वारसा अधिनियम किंवा इतर कायद्यातही महिलांनी नाव न बदलल्यास अधिकार कमी होतात असा नियम नाहीय.

women name change

|

Esakal

वारस

वैध विवाहामुळे महिलेनं नाव जरी बदललं नाही तरी पतीच्या मालमत्तेची कायदेशीर वारसदार ठरते.

women name change

|

Esakal

घटस्फोट

घटस्फोटानंतरही महिला पूर्वाश्रमीच्या पतीचं नाव किंवा आडनाव वापरू शकते. कायद्यात यावरही कोणतेच निर्बंध नाहीत.

women name change

|

Esakal

वेगवेगळी नावे

महिलांना नाव बदलताना वेगवेगळ्या कागदपत्रांवर वेगवेगळी नावे असतील तर त्या व्यक्ती वेगळ्या नसून एकच आहेत हे सिद्ध करावं लागतं.

women name change

|

Esakal

नावात बदल

महिला किंवा पुरुषाला नाव बदलायचं असेल तर सरकारी राजपत्रात जाहिरात देऊन नाव बदलून घेता येते.

women name change

|

Esakal

UPSCत ८५वी रँक, तरी IAS ऐवजी IPS निवडलं, NIA नंतर आता CRPFमध्ये मोठी जबाबदारी; कोण आहेत IPS संजुक्ता पराशर?

Sanjukta Parashar

|

Esakal

इथं क्लिक करा