UPSCत ८५वी रँक, तरी IAS ऐवजी IPS निवडलं, NIA नंतर आता CRPFमध्ये मोठी जबाबदारी; कोण आहेत IPSसंजुक्ता पराशर?

सूरज यादव

संजुक्ता पराशर

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महानिरीक्षक पदी २००६च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी संजुक्ता पराशर यांची नियुक्ती करण्यात आलीय.

Sanjukta Parashar

|

Esakal

आसाम

आसाममध्ये १९७९मध्ये जन्म झालेल्या संजुक्ता यांना लहानपणापासून शिक्षणात आवड होती. वडील सिंचन विभागात इंजिनिअर तर आई आरोग्य विभागात कार्यरत होती.

Sanjukta Parashar

|

Esakal

उच्चशिक्षण

गुवाहाटीत प्राथमिक शिक्षणानंतर दिल्लीत राज्यशास्त्रातून संजुक्ता यांनी पदवी घेतली. त्यानंतर जेएनयूत आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातून एमए, एमफिल आणि पीएचडी पूर्ण केली.

Sanjukta Parashar

|

Esakal

युपीएससी

संजुक्ता यांनी २००६मद्ये युपीएससीत देशात ८५वी रँक मिळवली होती. आयएएस होण्याची संधी असतानाही त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला.

Sanjukta Parashar

|

Esakal

आसाम मेघालय कॅडर

देशाच्या सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेत संजुक्ता यांना काम करायचं होतं. त्यांनी आसाम मेघालय कॅडरमध्ये सुरुवात केली.

Sanjukta Parashar

|

Esakal

कारवाई

आसाममध्ये उग्रवाद्यांच्या भागात सशस्त्र कारवाई करत १५ महिन्यात १६ पेक्षा जास्त उग्रवाद्यांना चकमकीत संपवलं. तर ६४ जणांना अटक केली.

Sanjukta Parashar

|

Esakal

आयर्न लेडी ऑफ आसाम

संजुक्ता यांना आयर्न लेडी ऑफ आसाम म्हणून ओळखलं जातं. त्या आसामच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी ठरल्या.

Sanjukta Parashar

|

Esakal

NIA ते CRPF

राष्ट्रीय तपास संस्थेतही त्या उपमहानिरीक्षक होत्या. त्यांना गृहमंत्री पदकाने गौरवण्यात आलंय. आता देशातलं सर्वात मोठं अर्धसैनिक दल असलेल्या सीआरपीएफच्या आयजी पदी त्यांची नियुक्ती झालीय.

Sanjukta Parashar

|

Esakal

भारताचा तिरंगा कोणी बनवला?

इथं क्लिक करा