ट्रेनमधून फटाके नेता येतात का? जाणून घ्या नियम

सूरज यादव

सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा

दिवाळी सण तोंडावर आला असून बाजारपेठा फटाके, रांगोळ्या, आकाश कंदिल यांनी सजल्या आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षेचीही काळजी घेतली जाते.

Can You Carry Firecrackers on a Train? Here’s What Indian Railways Says

|

Esakal

रेल्वेचे नियम

सणांमध्ये काही अनुचित घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात येते. दिवाळी सणात फटाक्यांच्या वाहतुकीबाबत काही नियम लागू असतात. रेल्वेचेही काही खास नियम आहेत.

Can You Carry Firecrackers on a Train? Here’s What Indian Railways Says

|

Esakal

ज्वलनशील पदार्थ

फटाके ज्वलनशील आणि धोकादायक वस्तू आहेत. यामुळे कोणत्याही परिस्थितीत ट्रेनमधून याची वाहतूक करता येत नाही.

Can You Carry Firecrackers on a Train? Here’s What Indian Railways Says

|

Esakal

ट्रेनमध्ये बंदी

ट्रेनमधून फटाक्यांच्या वाहतुकीवर रेल्वेच्या अधिनियम कलम १६४ अंतर्गत बंदी घातली गेलीय. जर कुणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना दंड होऊ शकतो.

Can You Carry Firecrackers on a Train? Here’s What Indian Railways Says

|

Esakal

दंडात्मक कारवाई

फटाक्यांची वाहतूक करताना ट्रेनमध्ये सापडल्याच दंडात्मक कारवाई केली जाते. यासाठी १ हजार रुपये दंड किंवा गंभीर प्रकरणात ३ वर्षांची साधी कैद होऊ शकते.

Can You Carry Firecrackers on a Train? Here’s What Indian Railways Says

|

Esakal

फटाक्यांमुळे धोका

फटाके खूप ज्वलनशील आणि स्फोटक असतात. लहानशा ठिणगीमुळे किंवा गरम वस्तूशी संपर्कात आल्यानं आग लागू शकते. यामुळे प्रवाशी आणि ट्रेनच्या कर्मचाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो.

Can You Carry Firecrackers on a Train? Here’s What Indian Railways Says

|

Esakal

खबरदारीसाठी निर्णय

फटाक्यांवर बंदी घालून भारतीय रेल्वेनं खबरदारी घेतलीय. कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, प्रवाशांचा जीव धोक्यात पडू नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय.

Can You Carry Firecrackers on a Train? Here’s What Indian Railways Says

|

Esakal

वाहतूक धोक्याची

दिवाळी आणि इतर सणांवेळी इतर शहरांमध्ये स्वस्तात फटाके मिळतात म्हणून लोक खरेदी करतात. मात्र फटाक्यांची वाहतूक करणं धोक्याचं ठरू शकतं.

Can You Carry Firecrackers on a Train? Here’s What Indian Railways Says

|

Esakal

दिवाळी बोनस देण्याची प्रथा कधीपासून सुरू झाली? सरकारचा नियम काय?

Diwali Bonus

|

ESakal

इथं क्लिक करा