मटण खाल्ल्यानंतर दही खाऊ शकतो का? आयुर्वेद काय सांगतं?

Anushka Tapshalkar

नाशिक विषबाधा

नाशिकमध्ये मटणाच्या जेवणानंतर दही खाऊन विषबाधा झाल्याने पत्नीचा मृत्यू झाला असून पतीची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मटणानंतर दही खावं की नाही हा प्रश्न पडला आहे.

Is It Safe to Eat Curd After Mutton

|

sakal

समज-गैरसमज

मटण खाल्ल्यानंतर दही खाऊ नये, असा समज अनेकांमध्ये आहे. पण यामागे वैज्ञानिक आधार आहे का? आयुर्वेद आणि तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या.

Is It Safe to Eat Curd After Mutton

|

sakal

वैज्ञानिक उत्तर

निरोगी व्यक्तींमध्ये मटण खाल्ल्यानंतर दही खाणे सुरक्षित असल्याचे सध्याच्या संशोधनातून दिसून येते. ही जोडी हानिकारक असल्याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

Doctor's Advice | sakal

मग काहींना त्रास का होतो?

मटण हे चरबीयुक्त आणि प्रथिनांनी समृद्ध असल्याने पचायला वेळ लागतो. त्यासोबत जास्त प्रमाणात दही खाल्ल्यास काहींना जडपणा, पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Stomach Infection |

sakal

दह्याचे फायदे

जिवंत प्रोबायोटिक कल्चर असलेले दही आतड्यांच्या आरोग्यास मदत करू शकते. मात्र ते मटण लगेच पचवते, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

Curd Health Benefits

|

esakal

कोणी काळजी घ्यावी?

  • लॅक्टोज इन्टॉलरन्स असलेल्यांनी

  • वारंवार अॅसिडिटी किंवा अपचनाचा त्रास असलेल्यांनी

  • खूप तेलकट किंवा जड जेवणानंतर दही मर्यादित प्रमाणात खावे.

Is It Safe to Eat Curd After Mutton

|

sakal

वात विकारावर रामबाण उपाय! वडाच्या झाडाचे 'हे' 5 जबरदस्त औषधी फायदे नक्की वाचा

Health Benefits of Banyan Tree

|

sakal

आणखी वाचा