मुंगसाला पाळता येतं का? त्याचं तोंड बघितल्यास काय होतं?

संतोष कानडे

मुंगूस

मुंगूस हा एक वन्यप्राणी असून तो प्रामुख्याने जंगलात, शेतात आणि झुडपांच्या परिसरात आढळतो.

प्रजाती

भारतात मुंगसाच्या अनेक प्रजाती वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित आहेत.

कायदा

त्यामुळे रानातील मुंगूस पकडून घरी पाळणे किंवा त्याची खरेदी-विक्री करण्यावर कायदेशीर निर्बंध आहेत.

चपळ

मुंगूस हा चपळ, सावध आणि आपल्या परिसरातील हालचालींकडे लक्ष देणारा प्राणी आहे.

शुभ संकेत

मुंगसाचे तोंड पाहिल्याने काहीतरी चांगलं घडतं, शुभ संकेत मिळतो, असं म्हटलं जातं.

वैज्ञानिक पुरावा

मात्र, मुंगसाचे तोंड पाहिल्याने फायदा होता, याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

सामान्य घटना

मुंगूस दिसणे ही निसर्गातील एक सामान्य घटना आहे आणि त्याचा भविष्यातील घटनांशी संबंध जोडणे योग्य नाही.

आहार

मुंगूस प्रामुख्याने उंदीर, कीटक, सरडे आणि इतर लहान प्राणी खातो; त्याचा आहार प्रजाती व परिसरानुसार बदलतो.

चावा

मुंगूस दिसल्यास त्याला पकडण्याचा किंवा हाताळण्याचा प्रयत्न करू नये, कारण घाबरल्यास तो चावा घेऊ शकतो.

अंधश्रद्धा

त्यामुळे मुंगसाबद्दलच्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवण्याऐवजी त्याचे वन्यजीव म्हणून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

शिकार जिवंत ठेवूनच खाणारा जंगलातला क्रूर प्राणी

<strong>येथे क्लिक करा</strong>