Puja Bonkile
यंदा 3 मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे.
अनेकांना पाहायची उत्सुकता असेलच पण थेट डोळ्यांनी पाहावे की नाही हा प्रश्न पडला असेल.
चला तर मग याबद्दल समजून घेऊया.
हे चंद्रग्रहण आंशिक असणार आहे. वैज्ञानिकांच्या मते चंद्रग्रहण थेट डोळ्यांनी पाहू शकतो.
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्यामुळे डोळ्यांना कोणताही इजा होत नाही.
हे चंद्रग्रहण पाहण्यासाठी विशेष चष्मा किंवा फिल्टरची गरज नाही.
अधिक स्पष्ट दृश्य पाहायचं असेल तर दुर्बीण किंवा टेलिस्कोप वापरू शकता.
मोबाईलने फोटो काढताना फ्लॅश वापरू नका. नैसर्गिक प्रकाशातच सुंदर फोटो मिळतात.
Mediation
Sakal