Aarti Badade
'न्यूरोलॉजी' जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या जेनेटीक अभ्यासानुसार, विशिष्ट रक्तगट असलेल्या तरुणांमध्ये कमी वयात स्ट्रोक (Early Stroke) येण्याचा धोका जास्त असू शकतो.
Stroke and Blood Type Connection
Sakal
संशोधनानुसार, 'A1' उपगटातील रक्तगट असलेल्या लोकांना ६० वर्षांपूर्वी स्ट्रोक येण्याचा धोका इतर रक्तगटांच्या तुलनेत १६ टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळून आले आहे.
Stroke and Blood Type Connection
Sakal
दुसरीकडे, ज्या व्यक्तींचा रक्तगट 'O1' आहे, त्यांच्यामध्ये कमी वयात स्ट्रोक येण्याचा धोका इतर रक्तगटांच्या तुलनेत सुमारे १२ टक्क्यांनी कमी असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.
Stroke and Blood Type Connection
Sakal
मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटून ६० वर्षांपूर्वी येणाऱ्या स्ट्रोकला 'अर्ली-ऑनसेट स्ट्रोक' म्हणतात, ज्यामुळे दीर्घकालीन अपंगत्व येऊ शकते.
Stroke and Blood Type Connection
Sakal
शास्त्रज्ञांच्या मते, रक्तगट 'A' मुळे रक्तातील क्लॉटिंग प्रोटीन्सवर परिणाम होतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी (Blood Clots) सहज तयार होण्याची शक्यता वाढते.
Stroke and Blood Type Connection
Sakal
चेहरा एका बाजूला वाकणे, अचानक हात-पायात कमजोरी येणे, बोलताना अडखळणे, दृष्टी धूसर होणे आणि अचानक शरीराचा तोल जाणे ही स्ट्रोकची मुख्य सुरुवातीची लक्षणे आहेत.
Stroke and Blood Type Connection
Sakal
संशोधकांनी स्पष्ट केले आहे की हा वाढलेला धोका तुलनेने खूप कमी आहे; त्यामुळे केवळ रक्तगट 'A' असल्यामुळे घाबरून जाण्याची किंवा अतिरिक्त वैद्यकीय चाचण्यांची अजिबात गरज नाही.
Stroke and Blood Type Connection
Sakal
poha for diabetes
Sakal