मधुमेह असणाऱ्यांनी पोहे खावेत की नाही? डॉक्टरांनी सांगितले Glycemic Index चे सत्य

Aarti Badade

पोहे भातापेक्षा खरंच वाईट आहेत का?

ठाण्यातील केआयएमएस हॉस्पिटलचे डायबेटोलॉजिस्ट डॉ. विजय नेगलूर यांच्या मते, पोह्याला थेट भातापेक्षा 'वाईट' म्हणणे हे वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचे आहे.

poha for diabetes

|

Sakal

रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

पोहे हे चपट्या तांदळापासून बनत असल्यामुळे ते एक रिफाइंड कार्बोहायड्रेट आहे; त्यात फायबर कमी असल्याने केवळ पोहे जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.

poha for diabetes

|

Sakal

मधुमेह असणारे रुग्ण पोहे खाऊ शकतात का?

होय, मधुमेहाचे रुग्ण नक्कीच पोहे खाऊ शकतात; त्यांना पोहे आहारातून पूर्णपणे वगळण्याची अजिबात गरज नाही, फक्त ते खाण्याची पद्धत बदलणे आवश्यक आहे.

poha for diabetes

|

Sakal

पोहे खाताना 'प्रमाण'

मधुमेही रुग्णांनी सकाळी नाश्ता करताना एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर पोहे खाणे टाळावे आणि आपल्या रक्तातील साखरेनुसार त्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे.

poha for diabetes

|

Sakal

पोह्यांमध्ये प्रथिनांचा समावेश

पोह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रित करण्यासाठी त्यात शेंगदाणे, मोड आलेली कडधान्ये (मटकी/मूग) किंवा सोबत एक वाटी दही खाल्ल्यास साखर अचानक वाढत नाही.

poha for diabetes

|

sakal

फायबर

पोहे बनवताना त्यात वाटाणे, गाजर, कांदा किंवा ढोबळी मिरची यांसारख्या तंतुमय (Fibre) भाज्यांचा भरपूर वापर केल्यास पचनक्रिया मंदावते आणि ग्लुकोज हळूहळू शोषले जाते.

poha for diabetes

|

Sakal

संतुलन महत्त्वाचे

कोणत्याही पदार्थाला चांगले किंवा वाईट म्हणण्यापेक्षा, तो कसा बनवला आहे आणि कशासोबत खाल्ला आहे यावर त्याचे गुणधर्म ठरतात; त्यामुळे संतुलित आहार हाच मधुमेहावर उत्तम उपाय आहे.

poha for diabetes

|

Sakal

गाढ झोपेत हा अवयव करतो स्वतःची 'स्वच्छता मोहीम'! जाणून घ्या

Glymphatic System Cleans Brain at Night

|

Sakal

येथे क्लिक करा