कोणत्या वयात असतो कॅन्सरचा सर्वाधिक धोका? 90% प्रकरणे 'या' वयोगटात!

Aarti Badade

वय आणि कॅन्सरचा संबंध

वाढत्या वयाचा आणि कॅन्सरचा थेट संबंध असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे; विशेषतः ५० वर्षांनंतर शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Cancer risk by age

|

Sakal

५० वर्षांनंतर वाढतो धोका

कॅन्सरची सुमारे ९०% पेक्षा जास्त प्रकरणे ही ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतात, त्यामुळे या वयानंतर नियमित तपासणी गरजेची आहे.

Cancer risk by age

|

Sakal

निदानाचे सरासरी वय

साधारणपणे ६५ ते ६६ हे वय कॅन्सरचे निदान होण्याचे सरासरी वय मानले जाते. या वयात शरीरातील पेशींमध्ये वेगाने बदल घडत असतात.

Cancer risk by age

|

sakal

५५ ते ६४ वयोगटातील आव्हाने

५५ ते ६४ वर्षांच्या दरम्यान शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींना शरीरावर हल्ला करणे सोपे जाते.

Cancer risk by age

|

sakal

६५ ते ७४ वयोगटात सर्वाधिक रुग्ण

जागतिक आकडेवारीनुसार, कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण ६५ ते ७४ या वयोगटात आढळतात. या काळात शरीरातील जुने आजार आणि बदल स्पष्टपणे दिसू लागतात.

Cancer risk by age

|

sakal

कमकुवत 'इम्यून सिस्टम' हे कारण

वाढत्या वयानुसार पेशींची दुरुस्ती करण्याची क्षमता कमी होते. तसेच तंबाखू, प्रदूषण आणि चुकीच्या जीवनशैलीचा दीर्घकालीन परिणाम या काळात दिसू लागतो.

Cancer risk by age

|

Sakal

तरुणांमधील प्रमाण

२० ते ३० वयोगटात कॅन्सरचे प्रमाण अत्यंत कमी असते. तरीही, दुर्मिळ प्रकरणांमध्ये तरुण वयातही हा आजार होऊ शकतो, त्यामुळे जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.

Cancer risk by age

|

Sakal

किडनीवर ताण येतोय? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात!

Early signs of kidney damage

|

Sakal

येथे क्लिक करा