Aarti Badade
रक्त स्वच्छ करणे, टॉक्सिन्स बाहेर टाकणे आणि शरीरातील पाणी-मिनरल्सचे संतुलन राखणे ही किडनीची अत्यंत महत्त्वाची कामे आहेत.
Early signs of kidney damage
Sakal
जर तुमच्या डोळ्यांखाली वारंवार सूज येत असेल, तर हे किडनीवर ताण आल्याचे किंवा प्रथिनांच्या गळतीचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
Early signs of kidney damage
Sakal
रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीत फेस येणे किंवा तिचा रंग गडद पिवळा होणे ही किडनीच्या बिघडलेल्या कार्याची लक्षणे आहेत.
Early signs of kidney damage
Sakal
किडनी नीट काम करत नसेल तर शरीरात पाणी साठून राहते, ज्यामुळे पाय, टाचा किंवा चेहऱ्यावर सूज जाणवू लागते.
Early signs of kidney damage
Sakal
किडनीमध्ये विषारी पदार्थ साठल्यामुळे शरीरात अशक्तपणा जाणवतो, सतत मळमळल्यासारखे वाटते किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
Early signs of kidney damage
Sakal
शरीरात अतिरिक्त द्रव साठल्यामुळे फुफ्फुसांवर दाब येतो, ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. हे किडनी खराब होण्याचे गंभीर लक्षण आहे.
Early signs of kidney damage
Sakal
रक्त तपासणीतून (Creatinine) आणि लघवीच्या चाचणीतून (Protein levels) किडनीचे आरोग्य वेळेत तपासता येते; लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Early signs of kidney damage
Sakal
High blood pressure causes
sakal