Cancer Risk Habits : दिसतात साध्या, पण शरीराला पोखरतात 'या' सवयी! वाढू शकतो कर्करोगाचा धोका; वेळीच सावध व्हा, अन्यथा...

बाळकृष्ण मधाळे

कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या सवयी

वरवर सामान्य वाटणाऱ्या काही वाईट सवयी दीर्घकाळात आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. धूम्रपान, तंबाखू, अस्वास्थ्यकर आहार, व्यायामाचा अभाव आणि मद्यपान यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

Cancer Risk Habits

|

esakal

धूम्रपान आणि तंबाखू

सिगारेट, बिडी, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांमधील घातक रसायनांमुळे कर्करोगाचा धोका वाढतो. फुफ्फुसे, तोंड, घसा आणि मूत्राशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते.

Cancer Risk Habits

|

esakal

जंक आणि प्रक्रिया केलेले अन्न

जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न, लाल मांस आणि अति तळलेले पदार्थ वारंवार खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अस्वास्थ्यकर आहारामुळे लठ्ठपणा आणि शरीरातील दाह वाढण्याची शक्यता असते.

Cancer Risk Habits

|

esakal

फळे-भाज्यांचा अभाव

आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण कमी असल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक घटक कमी मिळू शकतात. संतुलित आहार आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाचा आहे.

Cancer Risk Habits

|

esakal

व्यायामाचा अभाव

दिवसभर बसून राहणे, बैठे काम आणि नियमित व्यायाम न करणे यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. नियमित शारीरिक हालचाल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Cancer Risk Habits

|

esakal

मद्यपान

मद्यपानामुळे शरीरातील पेशींना नुकसान होऊ शकते. यामुळे यकृत, तोंड, घसा, स्तन आणि आतड्यांच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

Cancer Risk Habits

|

esakal

आजपासून सवयी बदला

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तंबाखू टाळा, मद्यपान कमी/बंद करा, संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. आरोग्यदायी जीवनशैली दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरते.

Cancer Risk Habits

|

esakal

Heart Attack Prevention Tips : हार्ट अटॅकचा धोका टाळायचा आहे? मग, सकाळी उठल्याबरोबर चुकूनही करू नका 'या' चुका

Heart Attack Prevention Tips

|

esakal

येथे क्लिक करा...