Anushka Tapshalkar
काही गोष्टी छोट्या वाटत असल्या तरी, त्या गंभीर आजाराचं संकेत देत असतात. त्यामुळे कॅन्सरची शक्यता असलेल्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून घ्या.
अंथरुणात झोपूनही दमल्यासारखं वाटतंय? असा थकवा केवळ कामाचा नसतो – कधी कधी तो मोठ्या आजाराची चाहूल देतो.
भूक कमी होणं किंवा जेवणाबद्दलचा उत्साह अचानक गमावणं… ही गोष्ट साधी वाटली तरी दुर्लक्ष करू नका.
तुम्ही काहीही प्रयत्न न करता वजन झपाट्यानं कमी होतंय का? हे तुमचं शरीर काहीतरी सूचित करतंय… हे नक्की तपासून घ्या.
सतत वेदना होणं, तेही कुठलंही कारण न समजता – हे शरीरातल्या गंभीर बिघाडाचं लक्षण असू शकतं.
वारंवार जुलाब, कोष्ठबद्धता किंवा पोट साफ न होणं… ही लक्षणं आठवड्याभर टिकली, तर ती नक्कीच तपासायला हवीत.
काही न खाल्लं तरी सारखी मळमळ होतेय? हे शरीरात काहीतरी बिघडल्याचं लक्षण असू शकतं.
कधी स्वतःच्या शरीरावर गाठ किंवा सूज लक्षात आलीये का? ती वाढत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जा.
त्वचेवर किंवा तोंडातल्या जखमा काही केल्या बऱ्या होत नाहीयेत? ही बाब नक्कीच दुर्लक्षित करू नये.