बेडकाच्या आतड्यात सापडलं कॅन्सरवरील औषध

संतोष कानडे

बेडूक

एका विशिष्ट प्रकारच्या बेडकाच्या शरीरामध्ये चक्क कॅन्सरवरील औषध सापडलं आहे. जपानी ट्री फ्रॉग असं या बेडकाचं नाव आहे.

संशोधन

जपान अ‍ॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी यावरचं संशोधन केलं.

बॅक्टेरिया

बेडकाच्या आतड्यातील एका विशिष्ट बॅक्टेरियाने उंदरांमधील कर्करोगाच्या गाठी पूर्णपणे नष्ट केल्या. त्यामुळे हा यशस्वी प्रयोग समजला जातोय.

चाचणी

या संशोधनासाठी बेडूक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमधील एकूण ४५ वेगवेगळ्या बॅक्टेरियाच्या स्ट्रेन्सची चाचणी केली.

जपानी ट्री फ्रॉग

संशोधनाअंती जपानी ट्री फ्रॉगमध्ये इविंगेला अमेरिकाना हा बॅक्टेरिया सापडला. जो सर्वात यशस्वी ठरला.

अज्ञात बॅक्टेरिया

अशा जीवांच्या आतड्यांच्या सुक्ष्मजीवसंस्थेत अनेक अज्ञात बॅक्टेरिया प्रजाती असू शकतात, असं संशोधकांनी त्यांच्या अभ्यासामध्ये म्हटलं आहे.

ट्यूमर

बेडकाच्या आतड्यामध्ये आढळलेल्या बॅक्टेरियाने उंदराच्या शरीरातील ट्यूमर पूर्णपणे संपवल्याचंही शोधनिबंधामध्ये म्हटलं आहे.

संशोधन

भविष्यात मानवासाठी हे संशोधन फायदेशीर ठरेल, यात शंका नाही. यासंबंधाने आणखी चाचण्या होणार आहेत.

किंडर जॉयमध्ये आढळले घातक बॅक्टेरिया

<strong>येथे क्लिक करा</strong>