Sandeep Shirguppe
रात्री झोप न येणे ही एक सामान्य समस्या आहे. मात्र झोपेची कमतरता आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.
झोपण्याच्या आधी कॅमोमाईल किंवा तुळशीचा चहा प्यायल्याने मन शांत होते आणि झोप लवकर लागते.
दररोज ठरावीक वेळेस झोप घेतल्यास शरीराला सिग्नल मिळतो यावेळी झोपल्यास शांत झोप लागेल.
रात्री झोपताना खोबरेल अथवा बदाम तेल लावून झोपल्यास दाहकता कमी होऊन गाढ झोप लागते.
झोपण्याआधी किमान ३० मिनिटं स्क्रीनपासून दूर रहा. ब्लू लाइटमुळे मेंदूला झोप येण्यास अडथळा होतो.
झोपण्याआधी गार दूध आणि वेलदोडे यांचे सेवन केल्याने मेलाटोनिन आणि मॅग्नेशियम वाढतं हे झोपेसाठी फायदेशीर आहे.
तुमच्या झोपेच्यावेळी रूमध्ये शांतता ठेवा, तेथील वातावरण थंड असल्यास मेंदू नैसर्गिक झोपेस प्रवृत्त होतो.
तणाव मुक्त राहा, शरीर आणि मन शांत ठेवा. झोप येत नसल्यास औषधाऐवजी हे नैसर्गिक उपाय नेहमीच्या दिनचर्येत आणा.