रात्रीची झोप लागत नाही? सारखी जाग येते? 'या' टिप्स फॉलो करा!

Aarti Badade

रात्रीची झोप

आजकाल अनेकांना रात्री वेळेवर झोप न लागण्याची किंवा वारंवार जाग येण्याची तक्रार असते. यामागे शरीरातील 'मेलॅटोनीन' आणि 'सेरोटोनीन' या हार्मोन्सची कमतरता असू शकते.

Best food for sleep

|

Sakal

पोषक आहाराची योग्य वेळ

शांत झोप हवी असेल, तर झोपण्यापूर्वी किमान २ तास आधी हलका आणि पोषक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे पचन नीट होते आणि झोप चांगली लागते.

Best food for sleep

|

Sakal

चहा-कॉफीला म्हणा 'नाही'

रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफीसारखी कॅफीनयुक्त पेये पिणे टाळावे. कॅफीनमुळे मेंदू उत्तेजित राहतो आणि झोप येण्यास अडथळा निर्माण होतो.

Best food for sleep

|

Sakal

बदामाचे सेवन

बदाम खाल्ल्याने मेंदूला शांतता मिळते. यामध्ये असणारे मॅग्नेशियम स्नायूंना आराम देऊन नैसर्गिकरित्या झोप येण्यास मदत करते.

Best food for sleep

|

Sakal

गरम दुधाची जादू

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने मेंदू शांत राहतो. दुधातील पोषक घटक शरीराला रिलॅक्स करतात, ज्यामुळे गाढ झोप लागते.

Best food for sleep

|

Sakal

अक्रोड आणि किवी

अक्रोड आणि किवी यांसारखे पदार्थ मेंदू थंड ठेवण्यास मदत करतात. या फळांच्या सेवनाने झोपेची गुणवत्ता सुधारते.

Best food for sleep

|

Sakal

ओट्स आणि फॅटी फिश

ओट्स आणि फॅटी फिशमध्ये असे घटक असतात जे शरीरात झोपेचे हार्मोन तयार करण्यास मदत करतात. यामुळे तुम्ही रात्री वारंवार जागे होत नाही.

Best food for sleep

|

Sakal

डिजिटल डिटॉक्स करा!

झोपण्यापूर्वी मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर टाळावा. नैसर्गिकरित्या झोप येण्यासाठी मन शांत ठेवणे आणि सकस आहार घेणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

Best food for sleep

|

Sakal

जिममध्ये जाणाऱ्यांनी सावधान! जास्त प्रोटीन पावडर घेतल्याने शरीराचे 'हे' अवयव धोक्यात

Excess protein symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा