'या' शहरामध्ये नग्नतेला कायदेशीर मान्यता; लोक कपड्यांशिवाय फिरतात...

सकाळ डिजिटल टीम

कॅप डी आग्दे

कॅप डी आग्दे हे जगातील सर्वात वेगळं शहर असून येथे लोक कपड्यांशिवाय रस्त्यावर फिरतात, बँकिंग करतात आणि शॉपिंगही करतात

फ्रान्स

हे शहर फ्रान्समध्ये असून जगभरात कोणत्या ना कोणत्या कारणाने हे ठिकाण चर्चेत असतं.

लोकेशन

कॅप डी आग्दे हे दक्षिण फ्रान्समधील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक सुंदर रिसॉर्ट शहर आहे. हे ओक्सिटानी (Occitanie) प्रदेशातील एराल्ट (Hérault) विभागात येते.

न्युडिस्ट व्हिलेज

या शहराच्या एका विशिष्ट भागाला 'व्हिलेज नॅचुरलिस्ट' म्हटले जाते. हे जगातील सर्वात मोठे 'न्युडिस्ट व्हिलेज' म्हणून ओळखले जाते, येथे नग्नता हा एक जीवनशैलीचा भाग मानला जातो.

सर्वकाही कपड्यांशिवाय

इतर ठिकाणी लोक फक्त समुद्रकिनाऱ्यावर नग्न असतात, पण येथे लोक नग्न अवस्थेत रेस्टॉरंटमध्ये जेवतात, सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करतात आणि अगदी पोस्ट ऑफिस किंवा बँकेतही जातात.

जगाची राजधानी

जगाची 'नॅचुरलिस्ट राजधानी' या गावाला अधिकृतपणे 'जगाची नॅचुरलिस्ट राजधानी' म्हटले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत येथे दररोज ४०,००० पेक्षा जास्त पर्यटक या अनोख्या संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी येतात.

समुद्रकिनारा

येथील मुख्य आकर्षण म्हणजे साधारण २ किमी लांब असलेला सुंदर समुद्रकिनारा. येथे कोणत्याही प्रकारच्या कपड्यांची सक्ती नाही. येथील स्वच्छ पाणी आणि वाळू पर्यटकांना भुरळ घालते.

प्रवेश शुल्क

प्रवेशासाठी भरावा लागतो टॅक्स या 'नॅचुरलिस्ट' गावात प्रवेश करण्यासाठी पर्यटकांना एक विशिष्ट प्रवेश शुल्क किंवा 'नॅचुरलिस्ट टॅक्स' भरावा लागतो.

कशामुळे?

येथील लोक मानतात की शरीर जसे आहे तसे स्वीकारणे हाच खरा आनंद आहे. ही जागा केवळ फॅशन नसून मानवी शरीर आणि निसर्गाशी जोडलेली एक विचारधारा आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

महत्त्वाचे नियम

कोणाचेही फोटो काढणे सक्त मनाई आहे, कोणाकडेही टक लावून पाहणे किंवा असभ्य वर्तन करणे गुन्हा मानला जातो, स्वच्छतेसाठी हॉटेल किंवा खुर्चीवर बसताना स्वतःचा टॉवेल सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

गोव्यात सर्वात सुरक्षित आणि स्वस्त स्कुटी कशी मिळवाल?

येथे क्लिक करा