संतोष कानडे
गोव्यात अनेकजण फिरायला जातात. मात्र तिथे कॅबचे दर बघून डोकं चक्रावतं. त्यामुळे गोव्यात सर्वात स्वस्त स्कूटी भाड्याने कशी घ्यायची, ते पाहू.
तुम्हाला फक्त ३०० ते ४०० रुपये प्रतिदिवसाने स्कूटी मिळेल. तेही अगदी सुरक्षित. पीक सीझनमध्ये दे दर ५०० ते ७०० पर्यंत वाढतात.
महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जितके जास्त दिवस स्कूटी भाड्याने घ्याल, तेवढे त्याचे दर कमी होतात.
तुम्ही जर रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉप येथून गाडी भाड्याने घेतली तर मग जास्त पैसे पडतील. कारण एजंट लोक लुबाडणूक करतात.
स्कूटी रेंटवर घ्यायची असेल तर गेस्ट हाऊस, लहान हॉटेल्स किंवा स्थानिक लोकांना विचारून निर्णय घ्यावा.
स्कूटी भाड्याने घेण्यापूर्वी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स जवळ असणं आवश्यक आहे. मूळ कॉपी देऊ नका, झेरॉक्स काढून द्या.
गाडी घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा पासपोर्टची एक प्रत सोबत ठेवावी लागेल. ब्लँक चेक किंवा मूळ ओळखपत्र ठेऊ नका.
महत्त्वाचं म्हणजे करार पावती किंवा पक्की पावती घ्या. गाडीचे टायर जुने तर नाहीत ना, हे तपासा आणि ब्रेक लागत असल्याची खात्री करा.
स्कूटी घेण्यापूर्वी आणि परत करण्यापूर्वी तिचे स्पष्ट फोटो घ्या. तुमच्यावर झालेल्या नुकसानीचा खोटा आरोप टाळण्यासाठी हे आवश्यक आहे.