Shubham Banubakode
आयपीएलचे १७ हंगाम यशस्वीरित्या पार पडले असून १८व्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे.
या १७ वर्षांत मुंबई आणि चेन्नई या दोन संघानी सर्वाधिकवेळा विजेतेपद पटकावलं आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा, तर धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
याशिवाय विराट कोहलीनेही बंगळुरु संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र, त्यांना अद्यापतरी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
दरम्यान, तिघांच्या नेतृत्वात त्यांच्या संघाने किती सामने जिंकले जाणून घेऊया
आरसीबीने विराट कोहलीच्या नेतृत्वात १४४ सामने खेळले आहेत.
यापैकी ६८ सामने जिंकले असून ७२ सामन्यात आरसीबीचा पराभव झाला आहे. तर ४ सामने अनिर्णित राहिले आहेत.
विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीच्या विजयाची टक्केवारी ४७.२२ इतकी आहे.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात १५८ सामने खेळले आहेत.
यापैकी ८९ सामन्यात विजय मिळाला असून ६९ सामन्यात पराभव मिळाला आहे.
रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या विजयाची टक्केवारी ५६.३३ इतकी राहिली आहे.
याशिवाय चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाने धोनीच्या नेतृत्वात २२६ सामने खेळले आहेत.
यापैकी चेन्नईने १३३ सामने जिंकले असून ९१ सामन्यांमध्ये चेन्नईचा पराभव झाला आहे. तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत.
चेन्नईच्या विजयाची टक्केवारी ५८.८५ इतकी राहिली आहे.