Shubham Banubakode
आतापर्यंत आयपीएलचे १७ हंगाम पार पडले आहेत. १८ व्या हंगामाला २२ मार्च पासून सुरुवात होणार आहे.
पण आयपीएलमध्ये असे काही खेळाडू असे आहेत, जे २००८ च्या पहिल्या हंगामापासून २०२४ पर्यंत आयपीएल खेळले आहेत.
यापैकी काही खेळाडू १८ व्या हंगामातही खेळताना दिसतील. हे खेळाडू नेमके कोण आहेत? जाणून घेऊया.7 Players Who Have Played in Every IPL Season
धोनी २००८ पासून आयपीएल खेळतो आहे. तो या वर्षीही चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल. धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे.
कोहली २००८ पासून आयपीएल खेळतो आहे. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून २५२ आयपीएल सामने खेळले आहेत.
रोहित शर्मा २००८ पासून आयपीएल खेळतो आहे. त्याने एकूण २५७ सामने खेळले आहेत. तो डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.
वृद्धीमान साहा २००८ ते २०२४ पर्यंत आयपीएल खेळला आहे. त्याने गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आयपीएलमध्ये १७० सामने खेळले आहेत.
शिखर धवनने २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. धवन गेल्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने २२२ आयपीएल सामने खेळले आहेत.
कार्तिक २००८ ते २०२४ पर्यंत आयपीएलचा भाग होता. तो सुद्धा आता निवृत्त झाला आहे. कार्तिकने एकूण २५७ आयपीएल सामने खेळले.
२००८ पासून आयपीएल खेळत आहे. तो २०२५ मध्येही खेळताना दिसणार आहेत. मनीष पांडेने आतापर्यंत १७२ आयपीएल सामने खेळले आहेत.