Anushka Tapshalkar
सुट्ट्यांचे दिवस सुरू आहेत. मन मोकळं करून निसर्गात रमायला निघण्याची हीच वेळ! आता हॉटेल बुकिंगची झंझट नको, फक्त साथ हवी ती कॅराव्हॅनची!
'कॅराव्हॅन' म्हणजे चालतं-फिरतं घर! परदेशात लोकप्रिय असलेली ही ‘होम ऑन व्हील्स’ संकल्पना आता भारतात, अगदी आपल्या महाराष्ट्रातही उपलब्ध!
डबल-सिंगल बेडची मस्त सोय, जे दिवसाला सोफा म्हणून वापरता येतात. यामुळे छोट्या जागेत आरामाची सोयही होते.
गॅस स्टोव्ह, बेसिन, फ्रिज, भांडी आणि पाणी… कॅराव्हॅनमधल्या किचनमध्ये सगळं काही! हवं तेव्हा, हवं तिथे आणि हवं तसं जेवा!
लांबच्या प्रवासातली सर्वात मोठी चिंता मिटली! कॅराव्हॅनमध्ये आहे टॉयलेट आणि बाथरूमची सुविधा.
एलईडी टीव्ही, होम थिएटर, वाय-फाय आणि इनबिल्ट एसी लांबच्या प्रवासातही होते मनोरंजनाची सोय.
जंगल, समुद्र किनारा, डोंगरकडा, माळरान. तुम्हाला भावलेलं ठिकाणच तुमचं थांबण्याचं ठिकाण होऊ शकतं!
२०० ते ४०० लिटर पाण्याच्या टाक्यांची सोय! प्रवासात भरता येईल असं पाणी.
महाराष्ट्र सरकारकडून कॅराव्हनसाठी करसवलती. पर्यटकांचा खर्च कमी आणि पर्यटन वाढीला हातभार!
सुरक्षित पार्किंग, अनुभवी ड्रायव्हर, योग्य माहिती आणि साहित्याची खातरजमा हे नियोजन करूनच मग निघा बेफिकीर भटकंतीला!