झटका येण्यापूर्वी शरीर देतं 'हे' 5 सिग्नल; पायांतील बदल ठरू शकतात धोक्याची घंटा

Aarti Badade

पायांकडे दुर्लक्ष करू नका

कार्डियाक अरेस्ट अचानक येतो असे आपल्याला वाटते, परंतु आपले शरीर काही तास किंवा काही दिवस आधीच संकेत देऊ लागते. पायांमध्ये दिसणारी लक्षणे हृदयाच्या समस्येशी संबंधित असू शकतात.

Cardiac arrest symptoms in legs

|

Sakal

पाय किंवा घोट्यांना अचानक सूज

हृदय योग्य प्रकारे रक्त पंप करू शकत नसेल, तर शरीरातील द्रव खालच्या बाजूला साचू लागतात. पाय किंवा घोट्यांमध्ये अचानक सूज जाणवू शकते, हृदयाच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे.

Cardiac arrest symptoms in legs

|

Sakal

पाय सतत थंड पडणे

तुमचे पाय सतत थंड राहत असतील किंवा अधूनमधून सुन्न पडत असतील, तरखराब रक्ताभिसरणाचे लक्षण असू शकते. पायांना पुरेसा रक्तपुरवठा न होणे हे कार्डियाक अरेस्टचे पूर्वसंकेत असू शकतात.

Cardiac arrest symptoms in legs

|

Sakal

पायांमध्ये तीव्र वेदना आणि गोळे येणे

स्नायूंना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे पायात तीव्र वेदना होतात. चालताना किंवा रात्री झोपताना अचानक पायात गोळे येणे याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.

Cardiac arrest symptoms in legs

|

Sakal

पायांच्या त्वचेचा रंग बदलणे

रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास पायांचा रंग फिकट, निळसर किंवा जांभळट दिसू शकतो. त्वचेवर दिसणारे असे असामान्य बदल शरीरातील रक्ताभिसरण विस्कळीत झाल्याचे दर्शवतात.

Cardiac arrest symptoms in legs

|

Sakal

चालताना जाणवणारा प्रचंड थकवा

थोडं चालल्यावर किंवा जिने चढताना पाय भरून येणे किंवा कमजोरी जाणवणे हे हृदय कार्यक्षम नसल्याचे लक्षण आहे. शरीराला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे हा थकवा जाणवतो.

Cardiac arrest symptoms in legs

|

Sakal

इतर महत्त्वाची पूर्वलक्षणे

पायांच्या लक्षणांसोबतच छातीत दडपण, श्वास घेण्यास त्रास, अचानक खूप घाम येणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसल्यास २४ तासांच्या आत वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

Cardiac arrest symptoms in legs

|

Sakal

उन्हाळा असो वा पावसाळा; पुण्याजवळच्या 'या' 5 थंड हवेच्या ठिकाणांना नक्की भेट द्या!

Best hill stations near Pune

|

Sakal

येथे क्लिक करा