वय वाढतंय अन् चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतायत? ‘हे’ सीरम एकदा नक्की ट्राय करा!

Aarti Badade

चेहऱ्यावर सुरकुत्या

वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागल्या आहेत? घरच्या घरी गाजर-कोरफडीपासून सीरम बनवण्याची ही पद्धत जाणून घ्या.

wrinkles on face

|

Sakal

बीटा-कॅरोटीन

गाजरातील बीटा-कॅरोटीन आणि कोरफडीचा वापर करून त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि पोषण देणारे घरगुती सीरम तयार करता येते.

wrinkles on face

|

Sakal

सीरम बनवण्यासाठी

हे सीरम बनवण्यासाठी एक लहान किसलेले गाजर, एक चमचा बदाम किंवा रोझहिप ऑइल, दोन चमचे कोरफड जेल, एक चमचा गुलाबजल, अर्धा चमचा ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागेल.

wrinkles on face

|

Sakal

गाळून घ्या

किसलेल्या गाजरात तेल मिसळून मंद आचेवर ८ ते १० मिनिटे डबल बॉयलर पद्धतीने गरम करा आणि थंड झाल्यावर तेल गाळून घ्या.

wrinkles on face

|

Sakal

मिश्रण तयार करा

गाळलेल्या गाजराच्या तेलात कोरफड जेल, गुलाबजल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई मिसळून एकसंध मिश्रण तयार करा.

wrinkles on face

|

Sakal

फ्रिजमध्ये ठेवा

तयार मिश्रण स्वच्छ, कोरड्या गडद काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा आणि घरगुती मिश्रण असल्याने कमी प्रमाणात तयार करून लवकर वापरा.

wrinkles on face

|

Sakal

रात्री चेहरा स्वच्छ करून

रात्री चेहरा स्वच्छ करून सीरमचे काही थेंब लावा, मात्र वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा आणि त्वचेवर जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर थांबवा.

wrinkles on face

|

Sakal

महागडं फेशिअल की रोजचे स्किन केअर? ग्लोसाठी काय आहे बेस्ट

skin glow

|

Sakal

येथे क्लिक करा