Saisimran Ghashi
कोणतेही पिंपल्स, डाग असलेली नितळ त्वचा कोणत्याही रंगाची असली तरी छान दिसते.
पिंपल्स, काळे डाग, वांग, त्वचेचे आजार यांसारख्या अनेक समस्या मुलामुलींना भेडसावत असतात.
या सर्व समस्या कुणी खूपच सामान्य समजते तर कुणी त्यावर इलाज, नुसखे करत बसतो.
आम्ही तुम्हाला एका अशा ड्रायफ्रूट बद्दल सांगणार आहे जे नियमित खाल्ल्याने चेहरा आणि त्वचेच्या समस्या दूर होतील.
हे ड्रायफ्रूट आहे काजू. काजू खाणे त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे.
काजूमध्ये, तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम असते जे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करते.
काजूमध्ये कॉपर भरपूर प्रमाणात असते, जे कोलेजन उत्पादनात मदत करते ज्याने सुरकुत्या कमी होतात.
काजूमध्ये झिंक असते जे मुरूम,पुरळ हा त्रास कमी करून त्वचा चमकदार बनवते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.