Anushka Tapshalkar
उन्हाळा सुरु झाला की डिहायड्रेशन मुळे ओठ कोरडे पडायला सुरुवात होते.
ओठांना मऊ आणि गुळगुळीत ठेवण्याचा एक सोपा पण प्रभावी मार्ग म्हणजे एक्सफोलिएट करणे.
ओठांचा कोरडेपणा घालवण्यासाठी, ओठांमधील मृत पेशी काढून टाकायला लिप स्क्रब मदत करतो. त्यामुळे ओठ नरम, गुळगुळीत आणि हायड्रेटेड राहतात.
साखर नैसर्गिकरित्या ओठ एक्सफोलिएट करते, तर मध त्यांना खोलवर हायड्रेट करतो. दोन्ही एकत्र करून ओठांवर १-२ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.
खोबरेल तेल ओठांना मॉइश्चराईज करते, तर ब्राऊन शुगर त्वचा एक्सफोलिएट करते. दोन्ही घटक एकत्र करून ओठांवर मालिश करा आणि कोमट पाण्याने धुवा.
लिंबाचा रस नैसर्गिकरित्या ओठ उजळवतो, तर साखर सौम्य एक्सफोलिएशन करते. हे मिश्रण ओठांवर लावून १-२ मिनिटे मसाज करा आणि नंतर स्वच्छ धुवा.
कॉफी रक्ताभिसरण सुधारते आणि एक्सफोलिएशन करते, तर खोबरेल तेल ओलावा टिकवते. दोन्ही घटक एकत्र करून ओठांवर लावा, मसाज करा आणि धुवा.
बदाम तेल ओठांना मऊ बनवते आणि साखर एक्सफॉलिएट करून त्यांना गुळगुळीत करते. हे मिश्रण हलक्या हाताने मालिश करून काही वेळ ठेवा आणि नंतर धुवा.
अतिरिक्त एक्सफोलिएशन टाळा, आणि लिप बाम वापरा.