मांजर अचानक अंधारात किंवा भिंतीकडे एकटक का पाहते? त्यांना दिसतं तरी काय?

संतोष कानडे

मांजर

निसर्गाने मांजरींना अशी नजर दिली आहे, जी माणसांना कधीही न दिसणाऱ्या गोष्टी सहज पाहू शकते.

एकटक

मांजर अनेकदा घरातील एखाद्या रिकाम्या कोपऱ्यात किंवा भिंतीकडे तासन्तास एकटक पाहत राहते. माणसांना मात्र तिथे काहीच दिसत नसतं.

अल्ट्राव्हायोलेट

मांजरींचे डोळे अल्ट्राव्हायोलेट किरणे पाहू शकतात. त्यामुळे खोलीत पसरलेले अतिसूक्ष्म तरंग किंवा प्रकाशाचे बदलणारे पॅटर्न त्यांना स्पष्ट दिसतात.

रॉड सेल्स

मांजरीच्या डोळ्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त रॉड सेल्स असतात, ज्यामुळे त्यांना प्रकाशातील अगदी किरकोळ बदलही खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतात आणि त्या स्तब्ध होतात.

भुतं किंवा आत्मे

मांजरींना अंधारात भुतं किंवा आत्मे दिसतात, असं जुनी लोकं सांगतात. त्यामुळे मांजरींबद्दल एक अनोखं कुतूहल ग्रामीण भागामध्ये आहे.

सुपर सेन्स

विज्ञान असं सांगतं की, मांजर भिंतीकडे पाहते तेव्हा ती कोणत्याही भुताला पाहत नसून, तिच्या 'सुपर सेन्स'मुळे तिला जाणवणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचा ती अभ्यास करत असते.

शिकारीची प्रवृत्ती

मांजरींमध्ये उपजतच शिकारीची प्रवृत्ती असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची सूक्ष्म हालचाल किंवा आवाज झाल्यास त्या अत्यंत सावध होतात आणि परिस्थितीचा अंदाज घेतात.

लहान आवाज

मांजरींची ऐकण्याची क्षमताही माणसांपेक्षा खूप जास्त असते. भिंतीच्या पलीकडे किंवा जमिनीखाली असणारा उंदराचा अगदी लहान आवाज किंवा कीटकांची सळसळ त्यांना ऐकू येते.

माणसाच्या मृत्यूची चाहूल कुत्र्यांना आधीच कशी लागते?

<strong>येथे क्लिक करा</strong>