माणसाच्या मृत्यूची चाहूल कुत्र्यांना आधीच कशी लागते?

संतोष कानडे

मृत्यू

माणसाचा मृत्यू जवळ आला की श्वानांना त्याची चाहूल आधीच लागते, असं म्हटलं जातं. त्याची काही कारणंदेखील आहेत.

रुग्णालयं

अशा घटना अनेक रुग्णालयं आणि वृद्धाश्रमांमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे जुन्या माणसांचा यावर विश्वास आहे.

श्वान

काही श्वान अचानक अस्वस्थ होतात, भुंकतात किंवा रडल्यासारखा आवाज काढून विव्हळत राहतात.

क्षमता

कुत्र्यांना वास घेण्याची तीव्र क्षमता असते. त्यामुळे शरीरातील रासायनिक बदल ते सहज ओळखू शकतात, असं काही संशोधनांमधून पुढे आलेलं आहे.

हृदयविकार

केवळ मृत्यूच नाही तर हृदयविकार, फिट्स, कॅन्सर असे आजारदेखील श्वानांना आधीच ओळखू येतात, असं संशोधनातून स्पष्ट झालेलं आहे.

मृत्यूची चाहूल

कुत्र्यांना खरंच मृत्यूची चाहूल लागते का? याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत. मात्र शेकडो वर्षांपासून तसा लोकांचा विश्वास आहे.

रिल्स

अनेकदा आपल्या रिल्सच्या फीडमध्ये अपघातापूर्वी कुत्रे सावध झालेले बघितलेले आहेत. मालकाला ते तिथून खेचून दूर नेतात.

कुत्रा

कुत्रा हा केवळ एक पाळीव प्राणी नसून अत्यंत संवेदनशील जीव मानला जातो. त्यामुळेच ग्रामीण भागात त्याला पाळलं जातं.

मांजराचा आवाज ऐकल्याने कोणकोणते आजार दूर होतात? संशोधन काय सांगतं?

<strong>येथे क्लिक करा</strong>