सकाळ डिजिटल टीम
डोळ्याचा दाब वाढल्याने दृष्टी मंदावण्याचा आजार, वेळीच उपचार न घेतल्यास अंधत्व येऊ शकते.
दृष्टी धूसर होणे किंवा अस्पष्ट दिसणे हे काचबिंदूचे प्राथमिक लक्षण असू शकते.
डोळ्यांसमोर काळे ठिपके किंवा धूसर प्रतिमा दिसू शकतात, याकडे दुर्लक्ष करू नका.
डोळ्यांत असह्य वेदना किंवा जळजळ होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कमी प्रकाशात किंवा रात्री स्पष्ट दिसत नसेल तर हा काचबिंदूचा इशारा असू शकतो.
काचबिंदूमुळे प्रकाशाच्या भोवती इंद्रधनुष्यासारखे वलय दिसू शकते.
मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकार असलेल्या व्यक्तींना काचबिंदूचा धोका अधिक असतो.
आई-वडिलांना काचबिंदू असेल, तर पुढच्या पिढीला याचा धोका जास्त असतो. नियमित तपासणी गरजेची!